एक शेतकरी एक डीपी योजना अर्ज सुरु : Ek Shetkari Ek DP Yojana Yadi Maharashtra 2023

By Admin

Updated on:

राज्यातील शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत असलेली समस्या म्हणजे वारंवार विजेचा खंडित होत असलेला प्रवाह; कारण शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विज अत्यावश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीजप्रवाह उपलब्ध करून द्यावा. याअनुषंगाने शासनामार्फत नुकताच एक शेतकरी एक डीपी योजनाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

Ek Shetkari Ek DP Yojana

मित्रांनो, एक शेतकरी एक डीपी योजनेबद्दलच्या नवीन शासन निर्णयाबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी आपण एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (Transformer) योजना नेमकी काय आहे ? योजनेची उद्दिष्ट काय ? योजनेचे फायदे, अर्जासाठी आवश्यक कागदपत्र याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूयात.

♦️ हे पण वाचा : वारस नोंद 7/12 उताऱ्यावर ऑनलाईन कशी करावी

एक शेतकरी एक डीपी योजना (Scheme) शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 14 एप्रिल 2014 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली.

यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे विजेचा अनियमित पुरवठा, लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे, तांत्रिक वीज हानी, विद्युत अपघात, इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये. यासाठी उच्च दाब विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घेण्यात आला होता. सदर योजनेचा आतापर्यंत जवळपास 90 हजार शेतकऱ्यांना लाभ झालेला असून आणखीसुध्दा शेतकरी मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ मिळवत आहेत.

21 मार्च 2023 चा GR काय सांगतो ?

राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यासाठी नुकताच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. शासन निर्णयान्वये 2023 करिता राज्यामध्ये योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. साधारणतः राज्यातील 45,437 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपी (Transformer) बसणार आहे. यासाठी शासनाकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील शासन निर्णयाची PDF तुम्ही खालीलप्रमणे पाहू शकता.

शासन निर्णय PDF : येथे पहा

पात्रता काय असेल ?

  • अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी.
  • शेतकऱ्यांना प्रति HP 7,000 रु. इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल.
  • अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
  • खालील नमूद सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर करावी लागेल.

एक शेतकरी एक डीपी योजना कागदपत्रे

  • अर्जदार शेतकऱ्यांचा आधारकार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • शेतजमिनीचा 7/12 उतारा
  • जमिनीचा 8अ उतारा
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • बँक पासबुक

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

एक शेतकरी एक डीपी म्हणजेच एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी शेतकऱ्यांना Mahadiscom च्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक तुम्हाला खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेली आहे.

अर्जसाठी लिंकअर्ज येथे करा !
ग्रुप जॉईन कराव्हॉट्सॲप ग्रुप लिंक

अर्ज करतांना Agriculture क्षेत्र, हॉर्स पॉवर, अर्जदारांची माहिती, मोबाईल क्रमांक, ईमेल इत्यादी माहिती काळजीपूर्वक टाकून संपूर्ण माहिती पडताळणी करूनच अर्ज दाखल करा.


एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?

एक शेतकरी एक डीपी योजनेची अंमलबजावणी राज्यात 14 एप्रिल 2014 पासून करण्यात आली.

एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे ?

एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठीची एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment