Educational Loan : राज्यशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून शासनाचा हेतू असतो की, वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहता याचा लाभ मिळावा. कारण ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश मूल हुशार असतात, त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा असते; परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने त्यांना शिक्षण घेता येत नाही.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
वरील सर्व बाबींचा विचार करून शासनामार्फत शैक्षणिक कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जावरील व्याज देखील सरकार भरणार आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण याठिकाणी पाहुयात.
इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर 20 लाख रुपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा वितरित केला जात आहे. यासोबतच राज्यातील व देशातील अभ्यासक्रमासाठी 10 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून करण्यात येतो. शासनाच्या या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
शैक्षणिक कर्ज परतावा योजनेअंतर्गत येणारे अभ्यासक्रम
- मेडिकल अभ्यासक्रम : MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
- अभियांत्रिकी : B.E, B.Tech, B.Arch त्याचप्रमाणे संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
- व्यवसायिक अभ्यासक्रम : MBA, MCA, SHIPPING इत्यादीसह विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
- कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान : Animal & Fishery Science, B.Tech, BVSC, B.S.c त्याचप्रमाणे संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी व्याज परतावा योजना
केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, त्यानंतर नव्याने प्रवेश घेतलेली विद्यार्थी किंवा उमेदवार. ज्यामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशु विज्ञान इत्यादी विविध अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
परदेशी अभ्यासक्रमासाठी व्याज परतावा योजना
आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादींचा परदेशी अभ्यासक्रम व्याज परतावा योजनेअंतर्गत समावेश होतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
शैक्षणिक कर्ज घ्या ! 20 लाख रु. पर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा शासन करेल
तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून विशेष व्याज परतावा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
📢 हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी 15 लाखापर्यंत शासन कर्ज देणार
तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात किंवा राज्यअंतर्गत व देशांतर्गत एखाद्या अभ्यासक्रमात व्यवसायासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात. तुमच्याकडून घेण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाची व्याज भरणा रक्कम आता शासन करणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदाराचे किमान वय 17 व कमाल वय 30 वर्ष असावे.
- अर्जदार विद्यार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण, शहरी भागासाठी आठ लाखापर्यंत असेल.
- अर्जदार बारावी कक्षामध्ये कमीत कमी 60% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक.
- अर्जदारांचा सिबिल स्कोर किमान 500 पेक्षा जास्त असावा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी पुरावा
- अर्जदार व त्यांच्या आई किंवा वडिलांचा आधार कार्ड
- ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज हवा असेल, त्या अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका
- अर्जदार व अर्जदार पालकांचे पासपोर्ट फोटो
- अर्जदाराच्या जन्माचा पुरावा
- शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र
- आधार संलग्न बँक अकाउंट
- मान्यताप्राप्त संस्थेमध्ये सहभाग घेतल्याचा पुरावा.
‘व्याज’ परतावा परतफेडीचा कालावधी
विद्यार्थ्यांकडून कर्ज घेण्यात आल्यानंतर कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (12%) महामंडळाकडून देण्यात येईल. व्याज परताव्यासाठी अर्जदारांना जास्तीत जास्त 05 वर्षाचा कालावधी देण्यात येईल.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा अर्ज प्रक्रिया
विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून उमेदवाराची पात्रतेनुसार पडताळणी केली जाईल, त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा व्याज परतावा फेडन्यात येईल.
अर्जदारांना इतर कोणत्याही माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय समोर, राहाटी कॉलनी, नागपूर – 440022 या कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधता येतो.
📧 ई-मेल : dmobcamaravati@gmail.काम
📞 संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : 0712-2956086
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| इतर शैक्षणिक योजना | येथे क्लिक करा |