भारतातील कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांच मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे. मग मतदान कोणत्याही पातळीवरील असेल जश्याप्रकारे ग्रामपंचायत निवडणूक, लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक इत्यादी. मतदार यादीत आपलं नाव कसं शोधावं ? ग्रामपंचायत मतदार यादी PDF कशी Download करावी ? याविषयी सविस्तर माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.
ग्रामपंचायत मतदार यादी pdf 2024
ग्रामपंचायत निवडणूक, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यापैकी कोणतेही निवडणूक प्रशासनात लोकशाहीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. संबंधित निवडणुकीत नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या मतदानाचा अधिकार निश्चित करणे महत्त्वाचे असते. यामध्ये ग्रामपंचायत मतदार यादी महत्त्वाची असून यामुळे संबंधित ग्रामपंचायतमधील एकूण मतदारांचा आढावा मिळतो.
सध्या सुरू होत असलेल्या 2024 विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला जर ग्रामपंचायत मतदार यादी pdf डाऊनलोड करावयाची असेल, तर त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती याठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील अहमदनगर, हिंगोली, नागपूर, भंडारा, पुणे, लातूर इत्यादी विविध शहरातील जुनी 2023 मतदार यादी किंवा नवीन यादी खालीलप्रमाणे Download करता येणार आहे.
ग्रामपंचायत मतदार यादी आवश्यक का ?
मतदान करण्यापूर्वी एखाद्या नागरिकांच नाव मतदान यादीत आहे किंवा नाही ? हे पाहणं खूपच महत्त्वाच आहे. मतदार यादीत नागरिकांच संपूर्ण नाव, त्यांचा मतदान क्रमांक, रहिवासी पत्ता व इतर आवश्यक माहिती दिलेली असते. सोबतच यादीतून नागरिकांना त्यांच मतदान केंद्र कुठं आहे, हे समजण्यास मदत होते.
यादीतील नावात कोणतीही त्रुटी असल्यास नागरिकांना मतदान करताना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी pdf स्वरूपात डाऊनलोड करून तपासावी.
ग्रामपंचायत मतदार यादी pdf 2024 कशी download करावी
- ग्रामपंचायत मतदार यादी pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट उघडावी लागेल.
- वेबसाईटवर आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील, त्यामधील Electoral Roll – PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे विविध पर्याय दिसतील, त्यामधील तुमचा जिल्हा, Assembly Constituency, Language निवडायचा आहे.
- शेवटी देण्यात आलेला Captcha टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण गावाची ग्रामपंचायत मतदार यादी pdf स्वरूपात तुम्हाला दिसेल.
- त्यानंतर तुमच्या विभागानुसार PDF फाईल (Matdar Yadi) तुम्ही डाऊनलोड आयकॉनवर क्लिक करून पाहू शकता.
जर तुम्हाला मतदार (Voter List) कोणतीही कची अथवा चुकीची माहिती आढळून आल्यास त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सुचित करावे किंवा त्यांना सूचना द्यावी.
हेल्पलाइन क्रमांक – 1800221950/1950
फोन नंबर – 022-22021987
ई-मेल आयडी – ceo_maharashtra@eco.gov.in
मतदार यादी अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ग्रामपंचायत अपंग योजना महाराष्ट्र | येथे क्लिक करा |
मतदार यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
विविध योजनांची माहिती | येथे क्लिक करा |