Diyang Loan Scheme : दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून 50 हजारापासून 5 लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे.
दिव्यांगासाठी मुदत कर्ज योजना
महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 03 डिसेंबर 2001 रोजी जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने (Low Interest Rate) कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात.
या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने 50 हजारापासून 05 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, यामध्ये परतफेडीचा कालावधी 05 वर्ष असून लाभार्थी सहभाग 5% टक्के आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती
- लाभार्थी किमान 40 टक्के अपंग असावा.
- लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्ष यादरम्यान असावे.
- लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
- कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे असतील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- मतदान ओळखपत्र
- बँकेचा पासबुक
- रहिवाशी पुरावा
- पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
- कर्जबाजारी नसल्याबाबत ना-देय प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- करत असलेल्या व्यवसायाची माहिती
- व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास 100 च्या बाँडपेपरवर मालकाची संमती
- व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती
- व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प
- याव्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्र महामंडळाकडून मागितले जातील
अर्ज कसा व कुठे करावा ?
इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकतात.
📢 हे पण वाचा भाऊ : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान व बीज भांडवल
मित्रांनो, तुमच्या आसपास किंवा गावातील एखादा व्यक्ती, मित्र अपंग असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना स्वयंरोजगार, एखादा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल व स्वतःच्या पायावरती उभे राहतील
अर्जाचा PDF नमुना | येथे क्लिक करा |
संपर्क कार्यालय पत्ता | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |