Business Loan Scheme : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान व बीज भांडवल योजना, अर्ज सुरू; असा सादर करा कर्जाचा प्रस्ताव

By Admin

Updated on:

Business Loan : व्यवसाय सुरू करायचा म्हटलं, तर मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता भासते. आजच्या काळामध्ये कोणताही व्यवसाय लाख रुपयाच्या खाली राहिलेला नाही. जनसामान्य नागरिकाला व्यवसाय करणे, या काळात तर अशक्यच आहे; कारण स्वखर्चाने गरीब कुटुंबातील एखादा व्यक्ती व्यवसायामध्ये इतकी मोठी रक्कम गुंतवू शकत नाही.

बीज भांडवल योजना 2023 | Beej Bhandwal Yojana

वरील सर्व बाबींचा विचार करून समाजातील विविध स्तरावर विविध प्रवर्गासाठी शासनाकडून विशेष महामंडळ स्थापित करण्यात आलेली आहेत. महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यवसायिकांना 50 टक्के अनुदान व बीज भांडवल उपलब्ध करून दिलं जातं.

🔴 हे पण वाचा भाऊ : युवकांना व्यवसायासाठी शासन 50 लाख रु. देणार; CMEGP SCHEME

वेगवेगळ्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी त्याचप्रमाणे समाजातून नवीन व्यवसायिक तयार व्हावेत, या अनुषंगाने ही महामंडळे स्थापित करण्यात आलेली आहेत. या महामंडळाचा लाभ घेऊन, नवयुवक आपला नवीन व्यवसाय उभारू शकतात.

तुम्हालासुद्धा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे; पण त्यासाठी तुमच्याकडे भांडवल उपलब्ध नसेल, तर शासनाच्या बीज भांडवल योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता व तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आज आपण महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत देण्यात येत असलेल्या अनुदान व बीज भांडवल संदर्भातील अधिक माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

महात्मा फुले विकास महामंडळासाठी पात्रता, अटी व शर्ती

 • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदारांचा वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापर्यंत असावा.
 • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
 • अर्जदारांनी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • 50% अनुदान योजनेसाठी, प्रकल्प मर्यादा ही 50 हजार रुपयापर्यंतच असणे आवश्यक आहे.
 • बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, प्रकल्प मर्यादा 50 हजारापासून 5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
 • कर्ज योजनेसाठी अर्जदारांना पाच टक्के स्वतःचा सहभाग भरणे आवश्यक आहे.

या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत 50 टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावा.

कर्ज मंजुरीसाठी कागदपत्रं

 • जातीचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • आधारकार्ड
 • रहिवाशी पुरावा
 • व्यवसायाचा प्रस्ताव
 • मालाचे किमतीपत्रक
 • महामंडळाने निश्चित केलेली इतर कागदपत्र

अर्ज कुठे करावा ?

व्यवसाय तरुणांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल, तर संबंधित कर्जाचा प्रस्ताव महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व) मुंबई-51 या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

📍अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🔔 विविध योजनांसाठीयेथे क्लिक करा

 1. बीज भांडवल कर्ज योजना काय आहे ?

  तरुण व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणारी महामंडळाची महत्त्वकांक्षी योजना आहे.

 2. बीज भांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

  अर्जदारांना संबंधित मंडळाकडे बीज भांडवल कर्ज योजनेसाठी विहित नमुन्यातील कागदपत्र व प्रस्तावासह अर्ज सादर करावा लागतो.

 3. बीज भांडवल कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

  बीज भांडवल कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

 4. बीज भांडवल कर्ज योजना राज्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे ?

  बीज भांडवल कर्ज योजना राज्यातील विशिष्ट ठिकाणी महामंडळ स्थापित करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणीच लागू आहे. त्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती तपासावी लागेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment