डिजिटल सातबारा, 8अ उतारा, फेरफार ऑनलाईन कसा काढावा ? : How to Download Digital 7/12 Online

Land Record: मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा, 8अ उतारा किंवा फेरफार काढण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, वेबसाईटची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

७/१२ उतारा वेबसाईट लिंक : येथे क्लिक करा

वेबसाईटवर आल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन (New User Registration) पर्यायावर क्लिक करून मूलभूत माहिती भरून नोंदणी करून घ्यावी. माहिती भरत असताना Login Id व Password लक्ष्यात ठेवावा.

असा डाऊनलोड करा डिजिटल 7/12

  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिन करावे. लॉगिन करताना मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल तो तिथे टाकावा.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर 7/12, 8अ उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी पर्याय वरील बाजूस दिसतील.
  • तुम्हाला जो आवश्यक कागदपत्र डिजिटल स्वरूपात हवा असेल, त्यावरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडावा.
  • त्यानंतर तुमच्या जमिनीचा गट क्रमांक म्हणजेच सर्व्ह नंबर टाकावा.
  • पुढील स्टेपमध्ये तुम्हाला 15 रु. रक्कम कागदपत्र डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी द्यावी लागेल.
  • जर तुम्ही वॉलेटला आधीच रक्कम जमा केली असेल तर वेळ लागणार नाही अन्यथा कागदपत्र डाऊनलोड करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय इत्यादीच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करावे लागेल.

अश्याप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती सातबारा, 8अ उतारा किंवा फेरफार नक्कल फक्त पंधरा रुपयेमध्ये डाउनलोड करू शकता. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमचा ग्रुप जॉईन करून व्हाट्सअपवरती आम्हाला प्रश्न विचारू शकता.