Government Scheme : शासनाकडून नागरिकांसाठी विविध अशा योजना राबविल्या जातात. या विविध योजनांमध्ये वैद्यकीय उपचारासाठीच्या योजनांचासुध्दा समाविष्ट आहेत. आरोग्यसंबंधित योजना (Scheme) सुरू करण्याचा शासनाचा मुख्य हेतू म्हणजे गोरगरीब व वंचित गटातील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया उपलब्ध करून द्यावेत हा होय.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 (MJPJAY)
शासनामार्फत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
♦️ हे पण वाचा : हा कार्ड काढा 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळवा
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नेमकी काय आहे ? तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अल्प उत्पन्न, गरीब व वंचित कुटुंबातील गंभीर आजारी रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्यामध्ये उपचारासह विविध आजाराच्या शस्त्रक्रियासुध्दा मोफत करण्यात येतात.
आता 1.5 लाखाऐवजी 5 लाखापर्यंत मोफत उपचार
योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत योजनेच्या माध्यमातून उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून 1.5 लाख रु. इतकी रक्कम दिली जायची; परंतु राज्य मंत्रिमंडळात नुकताच जन आरोग्य योजनेसंदर्भात महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे नागरिकांना आता उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.
लाभ कोणाला मिळणार ?
लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष अट योजनेमध्ये ठेवण्यात आलेली नाही. फक्त योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकाकडे पिवळा, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा यापैकी एक कोणताही रेशन कार्ड असावा. याचप्रमाणे आश्रम शाळेतील मुलं, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांनासुद्धा योजनेचा लाभ दिला जाईल.
लागणारी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- रहिवाशी पुरावा
- पिवळा किंवा केशरी शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- उत्पन्न दाखला
- खासगी किंवा शासकीय डॉक्टरांचा रोगासंदर्भातील पुरावा
MJPJAY साठी अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही; परंतु योजनेअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यामध्ये तुम्हाला उपचार किंवा शस्त्रक्रिया करायची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला व शिधापत्रिका म्हणजेच रेशनकार्ड इत्यादी कागदपत्र लागतील.
डाव्या डोळ्याचे आपले क्षण करणै
डाव्या डोळ्याचे आपरेक्षण
सर एकदा संबंधित योजना लागू असलेल्या दवाखान्यांमध्ये चौकशी करा
शरीरातील नसा कॅल्शिअम कमी झाले मुळे कमकुवत झालेने उभा राहता येत नाहीं, चालता येत नाही. गुडघे दुखतात..उपचार खर्चिक असलेने जन कल्याण योजनेतर्फे उपचार घेवू इच्छित आहे.