नवीन रेशनधान्य दुकानासाठी अर्ज सुरु : Ration Shop Online Application Process Maharashtra

By Admin

Updated on:

मित्रांनो, गावपातळीवर नागरिकांना वाटप करण्यात येणाऱ्या रेशनधान्य दुकानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. जर तुम्ही इच्छुक नागरिक किंवा व्यवसायिक असेल, तर तुमच्या गावांमध्ये तुम्ही रेशनधान्य वाटपाचे दुकानं विक्रेता होऊ शकता.

नवीन सुरु झालेल्या राशनधान्य दुकानासाठी अर्ज कसा व कुठे करावा ? अर्ज करताना आवश्यक कोणती कागदपत्रे लागतील ? या संदर्भातील संपूर्ण व सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

Ration Shop Online Application Process

मित्रांनो, राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 218 पेक्षा जास्त राशनधान्य दुकानाच्या जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या या सर्व जागांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र अर्जदारांना या राशनधान्य दुकानासाठी अर्ज करता येणार आहे, यासंदर्भातीलच संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

2 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यासह जिल्ह्यातील इतर रिक्त राशनधान्य दुकानाच्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे प्रक्रिया चालू झालेले आहे. या संदर्भातील जाहिरातीमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, खेड, आंबेगाव इंदापूर, वेले, जुन्नर, पुरंदर, दौंड, हवेली, शिरूर, मुळशी या सर्व तालुक्यामधील २१८ रिक्त राशन धान्य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रेशनधान्य दुकानासाठी खालीलप्रमाणे प्राधान्य

  • ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था
  • संबंधित गावातील नोंदणीकृत स्वय:सहाय्यता बचतगट
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
  • महिला बचतगटाच्या सहकारी संस्था
  • संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदिणी झालेल्या सहकारी संस्था

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून ग्रामसभेचा ठराव
  • ग्रामपंचायत राशनधान्य दुकान मागणी अर्ज टेरस पत्रक
  • ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • राशन दुकान चालू करत असलेल्या ठिकाणाची संपूर्ण माहिती
  • अर्जदाराच्या बँकेचा पासबुक झेरॉक्स
  • इतर आवश्यक कागदपत्र (तहसील कार्यालयामध्ये माहिती)

अर्जाचा नमुना कुठे मिळणार ?

तुम्हाला जर संबंधित जिल्ह्यातील राशनधान्य दुकानासाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्या जवळील तहसील कार्यालयामध्ये विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना घेऊन काळजीपूर्वक संपूर्ण अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व मुदतीपूर्वक कार्यालयामध्ये तो अर्ज दाखल करावा लागेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment