नुकताच दहावी व बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आला. आता बहुतांश विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, पुढील शिक्षणासाठी काय कराव ? किंवा यासाठी शासनाकडून Student Scholarship मिळते का ? कारण मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याकारणाने पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती तितकी सक्षम नसते. अशाच विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबविली जाते. याबद्दलचीच थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
डॉ. अब्दुल कलाम व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
पुणे महानगरपालिकामार्फत दरवर्षी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना यांतर्गत निश्चित शैक्षणिक अर्थसहाय्य दिलं जातं. दरवर्षाप्रमाणेच यावर्षीसुद्धा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणारा असून विद्यार्थ्यांना दिनांक 24 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
सदर शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज कसा करावा ? कोणती आवश्यक कागदपत्र लागतील ? योजनेच्या अटी व शर्ती व पात्रता काय असेल ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
शैक्षणिक अर्थसहाय्य योजना काय आहे ?
दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी थोडीफार मदत व्हावी, या हेतूने पुणे महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी शैक्षणिक योजना आहे. योजनेअंतर्गत मुख्यत्वे दोन योजना राबवल्या जातात. यामध्ये पहिली योजना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असून या योजनेच नाव भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आहे. योजनेअंतर्गत 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. दुसरी योजना म्हणजे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 25,000 रु. आर्थिक मदत दिली जाते.
👆👆👆👆
अर्जासाठी विद्यार्थी पात्रता
अब्दुल कलाम दहावी शिष्यवृत्ती योजनेसाठी ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करावयाचा असेल, त्यांना खालील देण्यात आलेल्या निकषाचे पालन करणे अनिवार्य आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या अटी व शर्ती देण्यात आलेला आहेत, तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला या पात्रता किंवा अटी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असावेत.
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी 80 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी जर पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील असेल, रात्री शाळेतील असेल किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 70 टक्के गुण असावेत.
- या योजनेचा लाभ घेऊन इच्छिणारा विद्यार्थी/विद्यार्थिनी जर 40 टक्के अपंग असेल तर, अश्या विद्यार्थी/विद्यार्थिनीला दहावी किंवा बारावीमध्ये फक्त 65 टक्के गुण असल्यास सुध्दा सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थिनी दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
योजनेच्या अटी, शर्ती व नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Abdul Kalam 10th Scholarship Documents
- विद्यार्थी आधारकार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- महानगरपालिका करपावती
- जन्माचा दाखला
- महाविद्यालय प्रवेश पावती
- दहावी किंवा बारावी गुणपत्रक
- अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
अर्ज कसा व कुठे करावा ?
विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व विहित कागदपत्रासह पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर Online Apply करावं लागेल. अर्ज करण्यासाठीची लिंक तुम्हाला खालील रखाण्यामध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल, तर पालिकेकडून देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता.
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
टोल-फ्री क्रमांक | १८००१०३०२२२ |
निष्कर्ष (Conclusion) : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूपच महत्त्वाचे आहे. तुमचा मित्र किंवा नातेवाईकातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पाठवा. Abdul Kalam 10th, 12th Scholarship योजनेबद्दल आमच्यामार्फत सांगण्यात आलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल, या योजनेसंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की Comment करू शकता.
Abdul Kalam Scholarship अंतर्गत किती रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल ?
अब्दुल कलाम स्कॉलरशिप योजनेद्वारे दहावी पास विद्यार्थ्यांना, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी 15,000 रु. इतकी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाईल.
शैक्षणिक अर्थसहाय्य योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे ?
शैक्षणिक अर्थसहाय्य योजना किंवा अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना ही 10 वी व 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?
अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती योजना पुणे महानगरपालिकामार्फत सुरू करण्यात आली आहे.