या समाजासाठी शासन नवीन शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजना सुरू करणार : Sheli Mendhi Palan Yojana 2023

By Admin

Published on:

महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे राज्यात शेतीसोबत इतर पूरक व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जातात. यापैकी एक चलित व जास्त शेतकऱ्यांमार्फत केला जाणारा व्यवसाय म्हणजे, शेळी-मेंढी पालन व्यवसाय होय. पूर्वी फक्त धनगर व तत्सम समाजातील लोक शेळी किंवा मेंढीपालन व्यवसाय करत असतं; परंतु कालांतराने शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, या दृष्टीकोनातून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत शेळीमेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यात आला.

शेळी-मेंढीपालन अर्थसहाय्य योजना 2023

राज्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा शेळी मेंढीपालन व्यवसायाकडील वाढता कल पाहता, शासनाकडून आता एक नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आली. राज्य शासनाकडून या योजनेची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ही योजना नेमकी कोणत्या समाजासाठी सुरू करण्यात येईल ? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ? इत्यादी थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा घोषित करण्यात आलेली राज्यातील भटक्या जमाती धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शेळी-मेंढीपालन करता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रधान सचिव जे पी गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, आयुक्त डॉ.हेमंत वसेकर हे उपस्थित होते.

शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला भरपूर उत्पन्नासाठी नवीन योजना

शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता इतर पूरक व्यवसायद्वारे उत्पन्न कमवून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे या काळाची गरज आहे. सध्यास्थितीमध्ये सुद्धा शेळीपालनाकरिता विविध योजना राबविण्यात येतात; परंतु या नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनेमुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ठोस प्रस्ताव शासनाकडून तयार करण्यात येणार आहे. योजनेचे सनियंत्रण व ट्रेकिंग प्रणालीसुद्धा अतिशय काटेकोरपणे करण्यात यावी, अश्या सूचनासुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजनेचे मुख्य उद्देश

  • शेळी मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला गटाद्वारे रोजगार निर्मिती करून देणे.
  • स्थिर वाढीव उत्पन्नासाठी शेतकरी व शेळी मेंढी पालन समुदायाला चांगल्या दर्जाच्या शेळ्या मेंढ्या संगोपनासाठी आर्थिक मदत करणे.
  • त्याचप्रमाणे उच्च वंशावळीच्या मेंढ्या व शेळ्यांची संख्या वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सदर योजना राज्यात लवकरच रागवली जाणार असून या योजनेसाठी ‘एनसीडीसीकडून’ स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना पुढील तीन वर्षासाठी तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल. यासाठी राज्यस्तरावर फेडरेशन तयार करण्यात येईल त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर शेळी मेंढी सहकारी संस्था स्थापन करण्यात येईल.

निष्कर्ष : शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला शेळी मेंढी पालन योजनेचा हा निर्णय खूपच महत्त्वकांक्षी आहे. शेतकऱ्यांना व शेळी-मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या समुदायाला या योजनेचा नक्कीच फायदा होईल. सदर योजनेची शासकीय कार्यवाही म्हणजेच शासन निर्णय व इतर माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर याबद्दलची सविस्तर माहिती आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, धन्यवाद !

🌾 शेतकरी योजनायेथे क्लिक करा
🔔 सरकारी योजनायेथे क्लिक करा
🔰 शासन निर्णययेथे क्लिक करा
⚖️ रेशन न्यूजयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment