Fruit Crop Insurance : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. राज्यातील 26 जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली असून मृग बहारासाठी म्हणजेच खरीप फळ पिकविमा योजना सुरू झालेली आहे. विमा योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
फळपीक विमा योजना 2023 (आंबिया, मृग बहार)
कृषी क्षेत्राच्या उत्पन्न वाढीमध्ये फळ पिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. फळ पिकांची मागणी जास्त असल्याकारणाने शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्न सुद्धा चांगलंच आहे. उत्पन्न चांगला असला, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्यकारणाने फळ पिकांचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान, नैसर्गिक धोका, अवकाळी पाऊस इत्यादीपासून संरक्षण मिळावं यासाठी राज्यात फळ पीकविमा योजना सुरू करण्यात आली.
चालू वर्ष 2023-24 साठी फळबागांना हवामान आधारित विमा अर्ज मागविण्यात येत असून कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास, अशा प्रकारचे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल, अन्यथा त्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे. या फळबाग विमा योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, द्राक्ष, सीताफळ, व लिंबू, इत्यादी फळपिकांचा समावेश आहे.
फळपीक विमा योजनेची मुख्य उद्दिष्ठ कोणती ?
- नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावा.
- शेतकऱ्यांना बाजारातील नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे.
- फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो, अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करते.
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी हा फळपिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रति हेक्टरी भरावा लागणारा हफ्ता & शेवटची तारीख (Premium Installment & Last Date )
फळपीक | प्रति हेक्टरी हफ्ता | शेवटची तारीख |
---|---|---|
संत्रा | रु. 4,000/- | 14 जून 2023 |
मोसंबी | रु. 4,000/- | 14 जून 2023 |
डाळिंब | रु. 6,000/- | 14 जुलै 2023 |
द्राक्ष | रु. 17,000/- | 14 जून 2023 |
पेरू | रु. 10,000/- | 14 जून 2023 |
लिंबू | रु. 3,500/- | 14 जून 2023 |
चिकू | रु. 5,000/- | 30 जून 2023 |
सीताफळ | रु. 7,000/- | 31 जुलै 2023 |
फळपीक विमासाठी अटी कोणत्या ?
शेतकऱ्यांसाठी फळपीक विम्याच्या अटी ठेवण्यात आलेल्या नसल्या तरी, क्षेत्रपर्यादा त्याचप्रमाणे हंगामर्यादा ठरविण्यात आलेली आहे, म्हणजेच फळ पिकांसाठी शेतकरी जास्तीत जास्त 4 हेक्टरपर्यंत विमा उतरवू शकतात. एका फळविकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता शेतकऱ्यांना विमा अर्ज करण्याची मुभा आहे.
फळपीक विम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र (Documents)
- आधारकार्ड
- जमिनीचा 7/12 उतारा
- 8अ उतारा
- पीकपेरा स्वयंघोषणापत्र
- बँक पासबुक
- फळबागेचा टॅगिंग केलेला फोटो
- सामायिक क्षेत्र संमतीपत्र (आवश्यक असल्यास)
फळपीक विमा योजना अर्ज कुठे करावा ? (Online Application)
शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याजवळील सीएससी सेंटर, बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीकडून शेतकऱ्यांचा फळपीक विमा ऑनलाईन भरून घेतला जाईल. त्याचप्रमाणे शेतकरी pmfby.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
जिल्हानिहाय पीकविमा कंपनी
• रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : नगर, अमरावती, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नागपूर (टोल-फ्री क्रमांक – 18001024088, दूरध्वनी क्रमांक – 02268623005)
• एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स : बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर (टोल-फ्री क्रमांक – 18002660700, दूरध्वनी क्रमांक – 02262346234)
• भारतीय कृषी विमा कंपनी : बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव (टोल-फ्री क्रमांक – 18004195004, दूरध्वनी क्रमांक – 02261710912)
फळपीक विमा ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
इतर विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
खरीप फळपीक विमा 2023 अर्ज सुरू झाला आहे का ?
हो, फळपीक विमा मृगबहार 2023 साठी अर्ज सुरू झाला आहे. शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
फळपीक विमा 2023 साठी शेवटची तारीख किती आहे ?
फळनिहाय अंतिम तारीखा वेगवेगळया आहेत, वरील माहिती वाचावी.
फळपीक विमा योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
शेतकरी फळपिक विमा योजनासाठी ऑनलाईन जवळील CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अर्ज करू शकतात.