{अर्ज सुरू} शेळी, मेंढीपालनासाठी शासन देणार 25 लाख अनुदान : NLM Scheme Maharashtra 2023

By Admin

Published on:

मित्रांनो, शेळी, मेंढीपालनासाठी अनुदान देणाऱ्या शासनाच्या बहुतांश योजना आहेत. आज आपण NLM Scheme योजना संदर्भातील संपूर्ण माहिती जशाप्रकारे अर्ज कसा करावा, पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्र इत्यादी पाहणार आहोत.

2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत उद्योजकता व विकास कौशल्यावर आधारित नवीन राष्ट्रीय पशुधन योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना शेळी, मेंढी तसेच वराह पालनासाठी 50 टक्के अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.

अनुदान किती मिळणार ?

NLM योजनेअंतर्गत विविध पशूपालनासाठी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे, जश्याप्रकारे शेळी-मेंढी पालनासाठी अनुदान मर्यादा 50 लाख, कुकुट पालनासाठी अनुदान मर्यादा 25 लाख, तर वराह पालनासाठी अनुदान मर्यादा 30 लाख इतकी आहे.

सुधारित राष्ट्रीय पशुधन अर्थसहाय्य स्वरूप

  • 100 (शेळ्या अथवा मेंढ्या) + 5 (बोकड अथवा नर मेंढे) 10 लाख अनुदान
  • 200 (शेळ्या अथवा मेंढ्या) + 10 (बोकड अथवा नर मेंढे) 20 लाख अनुदान
  • 300 (शेळ्या अथवा मेंढ्या) + 15 (बोकड अथवा नर मेंढे) 30 लाख अनुदान
  • 400 (शेळ्या अथवा मेंढ्या) + 20 (बोकड अथवा नर मेंढे) 40 लाख अनुदान
  • 500 (शेळ्या अथवा मेंढ्या) + 25 (बोकड अथवा नर मेंढे) 50 लाख अनुदान

या योजनेमधील अर्थसहाय्य सामान्यता दोन हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर 50 टक्के अनुदानासह देण्यात येते. राज्य अंमलबजावणी एजन्सी मार्फत शिफारस केल्यानंतर बँक अथवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितरित केल्यानंतर शासनामार्फत अनुदानाची 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते उर्वरित 50 टक्के अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

📢 आयुष्मान भारत योजना; 5 लाखापर्येंत वैद्यकीय उपचार मिळवा

त्याचप्रमाणे जर प्रकल्प स्वनिधीतून उभारणी करत असल्यास त्यासाठीच्या निकष व नियम वेगवेगळे आहेत. त्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलची अधिक माहिती वाचू शकता.

कागदपत्र कोणती लागणार ?

NLM Scheme अंतर्गत अर्ज करत असताना अर्जदारांना खालीलप्रमाणे Documents तयार ठेवावे लागतील.

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • पॅनकार्ड
  • प्रकल्प अहवाल
  • कोणताही एक रहिवाशी पुरावा
  • शेतजमीन कागदपत्र (७/१२ ८अ उतारा)
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • आयकर रिटर्न (व्यवसाय असल्यास)
  • बँकेचा रद्द केलेला Cheque
  • GST नोंदणी (व्यवसायिकांसाठी)
  • लाईटबील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

NLM Scheme Maharashtra साठी अर्ज कसा करावा ?

NLM Scheme अंतर्गत अर्जदारांना खालील नमूद अधिकृत वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर पात्र अर्जदारांना शेळी मेंढी पालनासाठी अनुदान देण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स

पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळअर्ज येथे करा
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन कराजॉईन करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment


योजना ग्रुप जॉईन करा !
योजना ग्रुप जॉईन करा