राज्यातील युवकांना उद्योग व व्यवसायासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकार सतत विविध योजना, उपक्रम राबवित असतात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यापैकीच एक असून महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली युवकांसाठीची ही महत्त्वकांक्षी योजना आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP SCHEME)
राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित असून उच्च शिक्षण घेतलेले आहेत; परंतु वाढती लोकसंख्या, योग्य कामाचा मोबदला, शैक्षणिक पात्रतेनुसार काम न मिळणे यामुळे बरेच तरुण बेरोजगार आहेत. तरुणांना स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असतो; परंतु स्वतःचा भांडवल नसल्याकारणाने तरुण वर्ग व्यवसायाकडे वळत नाहीत.
♦️ हे पण वाचा : उद्योजक महिलांना दोन लाखापर्यंत कर्ज देणारी योजना; स्वर्णिमा योजना
वरील सर्व बाबींचा विचार करून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यक्रम आर्थिक वर्ष 2019 पासून सुरू करण्यात आला. स्वयंरोजगार व रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी व तरुणांना उद्योग क्षेत्रामध्ये चालना देणारी ही एक सर्वसमावेशक योजना ठरणार आहे.
योजनेचं संपूर्ण नाव | मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती योजना/कार्यक्रम |
कोणामार्फत सुरु | महाराष्ट्र राज्यसरकारमार्फत |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | सुशिक्षित बेरोजगार तरुण |
उद्देश | उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य करणे |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
विभाग | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग |
अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) काय आहे ? CMEGP योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र व पात्रता इत्यादीबद्दलची थोडक्यात माहिती.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक पात्रता (CMEGP Eligibility)
- अर्जदार युवक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष असेल.
- मागासवर्गीयासाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत असेल.
- अर्जदार कमीत कमी इयत्ता सातवी (7वी) उत्तीर्ण असावा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
- अर्जदारांना आधारकार्ड
- बँक पासबुक
- रेशनकार्ड
- पॅनकार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- जातीचा दाखला
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शैक्षणिक कागदपत्रं
- अर्जदारांचा हमीपत्र
- अर्जदारांना जो व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- अर्जदारांनी RDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यास त्याबाबतचा प्रशिक्षणाचा दाखला
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अनुदान किती? (CMEGP SUBSIDY)
- अर्जदार जर शहरी भागातील असतील, तर अश्या अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पच्या 25% अनुदान दिलं जात.
- अर्जदार जर ग्रामीण भागातील असतील, तर अश्या अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 35 टक्के अनुदान दिलं जात.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करावा ? (How to Apply For CMEGP Scheme)
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या CMEGP पोर्टलवर सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. अर्जाची लिंक खालील रखान्यांमध्ये देण्यात आलेली आहे.
कर्ज मागणीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रास किंवा खादी ग्रामोद्योग मंडळ संस्थेस सादर करावा लागतो. यानंतर संबंधित शासकीय विभागाकडून अर्जदाराची पडताळणी करून कर्ज मंजुरी दिली जाते.
CMEGP अंतर्गत अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
आमचा व्हॉट्सॲप ग्रूप | नक्की जॉईन करा |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत (CMEGP Scheme) किती अनुदान दिलं जात ?
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभार्थी युवकांना व्यवसायासाठी प्रकल्प मर्यादेच्या 35 टक्के अनुदान दिलं जातं.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP Scheme) काय आहे?
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर काही रक्कम देणारी शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी (CMEGP Scheme) किती वयोमर्यादा आहे ?
जर अर्जदार खुल्या प्रवर्गातील असतील, तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष असून मागासवर्गीय अर्जदारांना ही वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे.