1 रुपयात पीक विमा योजना 3 वर्षासाठी राबविण्यास मान्यता, शासन निर्णय (GR) आला : 1 Rupayat Pik Vima Yojana

By Admin

Updated on:

राज्य सरकारकडून 1 रुपयात पिक विमा योजना जाहीर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2023 ते 2026 या तीन वर्षात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्यातील 11 विमा कंपन्यांची निवडसुद्धा संबंधित विभागाकडून करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिकची माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

1 Rupayat Pik Vima Maharashtra 2023

यावर्षीचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करताना राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. ती योजना म्हणजे एक 1 रुपयांत पीकविमा योजना. सदर योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक द्यावा लागेल.

यावर्षी केंद्रसरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील 03 वर्षासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येईल. यासाठीची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध 11 विमा कंपन्या शेतकऱ्यांचा विमा भरून घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या असून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिक विमा पोर्टलवरती अर्ज करता येणार आहे.

जिल्हानिहाय खालील 11 कंपन्यांची निवड

महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये काही आमूलाग्र बदल करून पुढील 03 वर्षासाठी पीक विमा योजना राबविण्याची शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यातील पूर्वीच्या पिक विमा कंपन्या बदल करून नवीन विमा कंपन्यांची निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी जवळपास 11 विमा कंपनीची करण्यात आलेली निवड खालीलप्रमाणे आहे.

विमा कंपनीविविध जिल्हे
ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि.परभणी, वर्धा, नागपूर
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि.जालना, गोंदिया,कोल्हापूर
चोलामंडलम एम.एस जनरल इन्शुरन्स कं.लि.संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड
भारतीय कृषी विमा कंपनीवाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार
एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि.हिंगोली, अकोला, धुळे, पुणे
एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कं.लिधाराशिव
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीलातूर
भारतीय कृषी विमा कंपनीबीड

खालील बाबतीत पीकविमा लागू

  • जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
  • पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान
  • पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ व चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूसंख्यलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
  • नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान

विमा हप्ता आता सरकार भरणार

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रतिहेक्‍टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रकमेतून एक रुपये वजा करता उर्वरित सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान स्वरूपात राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असत.

हे पण वाचा : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शासन निर्णय (GR) आला ! आता वार्षिक 12,000 रु.

निष्कर्ष : राज्यशासनाकडून शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सर्व समावेशक पीक योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रु. भरून विमा योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून हा महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आलेला असून राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याच फायदा होणार आहे.

1 रुपयांत पीक विमा योजना 2023 शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी सुरू झालेली आहे का ?

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 साठी सुरू झालेली असून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी किती रक्कम भरावी लागते ?

पूर्वी शेतकऱ्यांना पिकाच्या टक्केवारीनुसार विमा हप्त्याचा भरणा करावा लागत असत; पण आता शासनाकडून फक्त 1 रुपया पीक विमा योजना सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये देऊन पिक विम्याची नोंदणी (Registration) करता येणार आहे.

फक्त 1 रुपयात पिक विमा योजना राज्यात केव्हापासून सुरू करण्यात आली ?

प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात 2016 पासून सुरू करण्यात आलेली आहे; परंतु शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पिक विमा हप्ता भरण्याची घोषणा 23 जून 2023 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली.

फक्त 1 रुपयात पिकविमा योजनाचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा ?

फक्त 1 रुपयात पिक विमा योजना म्हणजेच सर्व समावेशक पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी सेंटर, बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राला संपर्क साधावा लागेल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

1 thought on “1 रुपयात पीक विमा योजना 3 वर्षासाठी राबविण्यास मान्यता, शासन निर्णय (GR) आला : 1 Rupayat Pik Vima Yojana”

Leave a Comment