शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देणारी शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे VJNT Loan Scheme ही योजना वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल जातं. योजनेची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
तरुणांना व्यवसाय करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. शासनाव्यतिरिक्त विविध महामंडळाकडूनसुद्धा तरुणांना दुकान व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिल जात. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येतं, ही योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येते.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत इच्छुक व पात्र नागरिकांना 32-37 प्रकारच्या नवीन व्यवसायसाठी 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिल जात. महामंडळामार्फच्या या कर्जाची मर्यादा पूर्वी रु. 25,000/- इतकी होती, ती मर्यादा वाढवून रु. 1,00,000/- करण्या शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश व फायदा
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांची आर्थिक उन्नती करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून तात्काळ वित्तपुरवठा करणे.
- या समाजातील बहुतांश नागरिक छोटा व्यवसाय करत असतात, ज्यामध्ये मासाळ विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान इत्यादीचा समावेश आहे. अशा लघु उद्योगाला चालना देऊन खर्च उपलब्ध करून दिल्यास या समाजातील नागरिकांचा व्यवसाय चांगला चालून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवता येतो.
- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अपंग, निराधार व विधवा महिलांना तात्काळ व प्राधान्याने लाभ देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, लघु व्यवसायासाठी व्याज खर्च योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे.
VJNT Karj योजनेअंतर्गत नागरिकांना खालील व्यवसाय करता येतील 👇
1. मत्स्य व्यवसाय | 2. कृषी क्लिनिक |
3. पावर टिलर | 4. हार्डवेअर-पेंट शॉप |
5. सायबर कॅफे | 6. संगणक |
7. झेरॉक्स-स्टेशनरी | 8. सलून |
9. ब्युटी पार्लर | 10. मसाला उद्योग |
11. पापड उद्योग | 12. मिरची कांडप |
13. वडापाव विक्री | 14. भाजी विक्री |
15. D.T.P वर्क | 16. स्वीट मार्ट |
17. ड्राय क्लिनिंग | 18. हॉटेल |
19. गॅरेज | 20. मोबाईल रिपेरिंग |
21. फ्रिज दुरुस्ती | 22. A.C दुरुस्ती |
23. मटन शॉप | 24. इलेक्ट्रिकल शॉप |
25. आईस्क्रीम पार्लर | 26. भाजीपाला विक्री |
27. मासळी विक्री | 28. फळ विक्री |
29. किराणा दुकान | 30. छोटेसे दुकान |
31. टेलिफोन बूथ | 32. लघुउद्योग |
कर्ज स्वरूप व परतफेड मुदत
- प्रकल्पात मंडळाचा सहभाग 100 टक्के असेल.
- प्रकल्पासाठी एकूण रक्कम 1,00,000 रु. देण्यात येईल.
- व्याजदर : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतेही प्रकारचा व्याज आकारला जाणार नाही.
- कर्जाची परतफेड नियमित वेळेवर न करणाऱ्या लाभार्थ्यांना दंडनीय व्याजदर आकारण्यात येईल.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना (VJNT Loan Scheme) आवश्यक कागदपत्रं – Documents
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
- प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शिधापत्रिका
- मागणी केल्यास इतर आवश्यक कागदपत्र
VJNT Loan Scheme Online Application
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटवर आल्यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला नवीन नोंदणी करून घ्यावयाची आहे.
- नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला संबंधित योजनेचा सविस्तर व काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्र व इतर माहितीसाठी आपण पात्र आहोत का? याची पडताळणी करावी, त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरावा.
- तुम्हाला वैयक्तिक स्वतःला अर्ज भरता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरून घेऊ शकता.
- अधिक माहिती नियम, अटीसाठी या योजनेचा अधिकृत शासन निर्णय खालील रखान्यात देण्यात आलेला आहे, तो नक्की वाचून घ्या.
अधिकृत शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |