Varas Nond : एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या संदर्भात मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावा सादर करावा लागतो. त्यापैकीच एक महत्त्वाचं कागदपत्र किंवा पुरावा म्हणजे ‘वारस दाखला‘ होय. या दाखल्यामुळे संबंधित व्यक्ती एखाद्या शेतजमिनीवर किंवा अन्य प्रॉपर्टीवर वारस अधिकार मिळवण्यास पात्र आहे, असं सिद्ध होतं. यामध्ये संपत्ती, विमा पॉलिसी लाभ, पगार, थकबाकी, नोकरी, शेअर्स इत्यादी हक्कांचा समावेश असतो.
नोंद प्रकार | वारस नोंदणी ऑनलाईन |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महसूल विभाग |
कायदा | वारसा हक्क कायदा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारस नोंद म्हणजे काय ?
शेतजमीन किंवा इतर प्रॉपर्टी ज्या व्यक्तीच्या नावाने असेल, त्या व्यक्तीचा अकस्मात किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना जमिनीच किंवा इतर मालमत्ता हक्क मिळू शकतो; परंतु त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंदणी करणं अनिवार्य असतं, याच संपूर्ण प्रक्रियेला वारस नोंद म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून तीन महिन्याच्या आत वारस नोंदसाठी संबंधितांना अर्ज करावा लागतो.
आता वारस दाखला कसा काढावा ? वारस नोंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ? वारस प्रमाणपत्रासाठी कोण नोंद करू शकतात ? वारस हक्क प्रमाणपत्र कसं काढावं ? varas nond ऑनलाईन कशी करावी ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
अर्ज कोण करु शकतात ?
कुटुंबातील एखाद्या मालमत्ताधारण व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पश्चात त्या प्रॉपर्टीवर हक्क मिळवण्यासाठी वारस प्रमाणपत्र किंवा उत्तर अधिकारी प्रमाणपत्रासाठी खालीलपैकी व्यक्ती अर्ज करू शकतात.
- मयत व्यक्तींची विधवा पत्नी
- मयत व्यक्तींचा विधुर पती
- मयत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी
- मयत व्यक्तींची आई
वारस नोंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents)
- वैद्य माहितीसह भरलेला फॉर्म
- घराच्या नोंदणीचा व पत्याचा पुरावा
- कोर्टाचा स्टॅम्प
- राशन कार्ड
- वारसदारांचा प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदारांना ओळखपत्र (आधारकार्ड)
- मृत्यू दाखला
- मयत व्यक्ती शासकीय सेवेत असल्यास त्याबाबतची सेवा पुस्तिका आणि सक्षम अधिकारी यांच्याकडील सेवा समितीचे पत्र
वारस नोंद Online कशी करावी?
पूर्वी वारसांची नोंद करण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावं लागायचं; परंतु ही प्रक्रिया वेळखाऊ त्याचप्रमाणे पारदर्शक नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून ऑनलाईन वारस नोंद करण्यासाठी ई-हक्क प्रणाली सुरू करण्यात आली. सध्यास्थितीला नागरिकांना वारस नोंद Offline व Online या दोन्ही पद्धतीने करता येते. ऑफलाईन वारस नोंदीसाठी तलाठी किंवा मा.दिवाणी न्यायालयात अर्ज सादर करावा लागतो, तर वारस नोंद ऑनलाईन तुम्ही खालीलप्रमाणे करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला varas nond online करण्यासाठी महसूल विभागाच्या pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात शेवटी (महत्त्वाची सूचना : ७/१२ दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली या लाल कलरमधील लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्हाला Public Data Entry या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल.
- आता Proceed to login या बटनावर क्लिक करून आधी स्वतःचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या.
- त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, ई-मेल आयडी, पिन कोड इत्यादी माहिती भरून घ्या, त्यानंतर देश, राज्य, जिल्हा अनुक्रमे टाकल्यानंतर Select City मध्ये तुमचं गाव निवडा.
- त्यानंतर Address Details मध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणची माहिती टाका, शेवटी सांकेतांक कोड टाकून Save या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरात रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यासंदर्भात मेसेज दिसेल, आता Back बटनवर क्लिक करून पुन्हा डॅशबोर्डवरती परत या.
- आता नोंदणी करताना टाकलेला युजरनेम व पासवर्ड परत एकदा टाकून लॉगिन करून घ्या. लॉगिन झाल्यानंतर Details हा पेज उघडा, त्या ठिकाणच्या ‘७/१२ mutations‘ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर युजरच्या प्रकारानुसार पर्याय निवडा जशाप्रकारे user is citizen किंवा user is bank त्यानंतर प्रोसेस या बटणावर क्लिक करा. आता ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क‘ हा पेज उघडेल. या पेजवरील माहिती भरल्यानंतर तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल, तो वारस नोंद पर्याय निवडा.
- आता तुमच्यासमोर वारस फेरफार अर्ज उघडेल. या ठिकाणी अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून घ्या, त्यानंतर ‘पुढे जा’ या बटणावर क्लिक करा. अर्ज जतन झाल्याबाबतचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती अर्ज क्रमांकासह दाखवला जाईल.
- आता ‘ओके’ बटणावरती क्लिक केल्यानंतर मयत व्यक्तींच नाव किंवा त्यांचा खाता क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’ या पर्यायावर क्लिक करून मयत व्यक्तींच नाव निवडा.
- त्यानंतर संबंधित खातेदारांचा गट क्रमांक निवडून मयत झालेल्या व्यक्तींची मृत्यू दिनांक टाका, त्यानंतर ‘समाविष्ट करा’ या पर्यायावर क्लिक करून खातेधारकांच्या जमिनीची माहिती त्याठिकाणी दिसत असल्याची खात्री करून घ्या.
- आता पुढे अर्जदार हा वारसांपैकी आहे का ? असा प्रश्न तुमच्यासमोर दिसेल ! होय किंवा नाही यापैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा’ या पर्यायावर क्लिक करा.
- वारस म्हणून ज्यांची नाव तुम्हाला नमूद करावयाची असतील किंवा वारस म्हणून ज्या व्यक्तींची सातबाऱ्याला तुम्हाला नाव लावायची असतील त्यांची व्यवस्थित माहिती भरा, त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा. त्यांची जन्मतारीख, वय, मोबाईल क्रमांक, पिन कोड, पोस्ट ऑफिस इत्यादी माहिती निवडून पुढील उर्वरित माहिती भरा.
- पुढील मयत व्यक्तींसोबत अर्जदारांच नातं निवडा, त्यानंतर शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला एकापेक्षा जास्त वारसांच नाव नोंदवायचं असल्यास पुढील वारस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही एकापेक्षा जास्त वारसांची नाव नोंदवू शकता.
- वारसांची माहिती भरल्यानंतर पुढे जावा या बटणावर क्लिक करा आणि आवश्यक ती कागदपत्रे ई-हक्क प्रणाली पोर्टलवर अपलोड करावीत, ज्यामध्ये मृत दाखल्याची सत्यप्रत, रेशनकार्ड, आधारकार्ड, मृत व्यक्तींच्या नावाने असलेल्या जमिनीचा 8अ उतारा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ऑनलाईन वारस नोंद घरबसल्या तुमच्या मोबाईलवरुन करू शकता.
Varas Nond Form in Marathi
वारसांची नोंद ऑफलाईन किंवा महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी अर्जदारांना विहीत नमुन्यातील वारस नोंद फॉर्म लागतो. वारस प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या अर्जाचे विविध नमुने तुम्हाला खालीलप्रमाणे डाउनलोड करता येतील. ज्यामध्ये वारस नोंद प्रमाणपत्र, ग्रामपंचायत वारस नोंद अर्ज नमुना, तलाठी वारस नोंद अर्ज नमुना इत्यादींचा समावेश आहे. या विविध वारस नोंद प्रमाणपत्राची Pdf डाऊनलोड करून तुम्ही संबंधित आवश्यक ठिकाणी वापरू शकता.
वारस दाखला कसा काढावा ?
वारसांची नोंद केल्यानंतर वारस दाखला ज्याला आपण वारसा हक्क प्रमाणपत्रसुध्दा म्हणतो, तो कसा काढावा याबद्दल सर्वांनाच शंका असते. वारस प्रमाणपत्र नमुना Pdf तुम्हाला खालील रखान्यात देण्यात आलेली आहे. वारस प्रमाणपत्र नमुना डाऊनलोड करून तुमच्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन त्याठिकाणी तुम्हाला तुमच्याकडून नोंदणी करण्यात आलेला वारस दाखला किंवा वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवता येतो.
वारस नोंद अर्जाचा नमुना (PDF) | येथे क्लिक करा |
वारस प्रमाणपत्र अर्ज (PDF) | येथे क्लिक करा |
निष्कर्ष : जनसामान्य नागरिकांची होणारी पायपीट व महसूल विभागात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली ऑनलाईन वारस नोंद ही सुविधा नागरिकांसाठी खूपच लाभदायक आहे. बहुतांश नागरिकांनी या डिजिटल युगात अशा विविध सुविधांचा लाभ नक्कीच मिळवावा. आम्ही आशा करतो, आमच्यामार्फत देण्यात आलेली माहिती तुमच्या उपयोगी आली असेल, माहिती कामाची वाटल्यास तुमच्या मित्रापर्यंत नक्की पाठवा !
वारस नोंद म्हणजे काय ?
घर, जमीन किंवा इतर संपत्तीवरील अधिकार एका पिढीकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत असतात. ही अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी एका कायदेशीर न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते, याच प्रक्रियेला ‘वारसा नोंद’ म्हणतात.
वारस नोंद ऑनलाईन कशी करावी ?
ऑनलाईन एकदम सोप्या पद्धतीने वारस नोंद करता येते, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
वारस नोंद किती दिवसात होते ?
वारस नोंद प्रक्रिया कमीत कमी वारस नदीचा अर्ज दिल्यापासून 30 दिवसाच्या कालावधीत होते. अर्जामध्ये काही त्रुटी किंवा आक्षेप आढळून आल्यास हा कालावधी वाढू शकतो.
वारस दाखला कसा काढावा ?
वारस दाखला काढण्यासाठी तुम्हाला जवळील नगरपालिका/तालुक्याच्या कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यास अधिकृत वेबसाईटला भेट देऊन दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो.
घराची वारस नोंद कशी करावी ?
घराची वारस नोंद करण्यासाठी संबंधित अर्जदारांना गावातील ग्रामपंचायत भेट देऊन ग्रामसेवक व तलाठी यांना यासंदर्भात चौकशी करावी किंवा न्यायालयीन प्रक्रियेतूनसुद्धा घराची वारस नोंद करता येते.