तार कुंपण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया व अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

तार कुंपण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित विभागाकडे प्रस्तावासह सादर करावी लागतात. त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र ? (Documents)

  • अर्जदारांचा आधारकार्ड (Aadhar Card)
  • जमिनीचा ७/१२ उतारा (Land Record)
  • गाव नमुना 8अ
  • जातीचा दाखला
  • शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा सहमतीपत्र
  • ग्रामपंचायतचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा ?

  • तार कुंपण योजना 2023 साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल.
  • विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील.
  • त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल, निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देय असेल.