गावातील भूजलाचा नकाशा आता ऑनलाईन मोबाईलवर पहा; तुमच्या गावात पाणी किती व कुठे आहे ?

By Admin

Published on:

शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, व्यवसायासाठी त्याचप्रमाणे इतर दैनंदिन कमासाठी पाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पाण्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जातात. यामध्ये जलजीवन मिशन, कृषी सिंचन योजना, मिशन अमृत सरोवर, अटल भूजल योजना इत्यादी शासकीय योजना व प्रकल्पांचा समावेश आहे.

ऑनलाईन भूजल नकाशा महाराष्ट्र

मानवी जीवनासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि याचे संवर्धन ही काळाची गरज आहे; कारण दिवसेंदिवस भूजलसाठा कमी होत चाललेला आहे असून, जल पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

♦️ हे सुध्दा वाचा : आता एका क्लिकवर डाऊनलोड करा शेतीची कागदपत्रं

यासाठी आपल्या ठिकाणच्या किंवा राज्यातील कोणत्या भागात किती भूजलसाठा आहे ? याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव, शहरांचा भूजल नकाशा ऑनलाईन (Bhujal Nakasha Online) उपलब्ध केलेला आहे.

भुजल विभागामार्फत देण्यात आलेल्या नकाशावर आपल्या गावातील भूजलाची स्थिती आपण जाणून घेऊ शकणार आहोत. भूजलाची माहिती सहजरीत्या आपल्या मोबाईलवर ॲपच्या साह्याने पाहता येणार आहे, ॲपवर काम सुरू असून लवकरच ॲप विकसित केला जाईल.

नकाशात भूजलाचे 5 स्तर

तुमच्या गावातील किंवा इतर ठिकाणचा महाराष्ट्र भूजल नकाशा तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर नकाशामध्ये पाच स्तर दिसतील. विविध स्तराला वेगळ्या प्रकारचा रंग देण्यात आलेला असून, पहिल्या निळसर पट्ट्यातील स्तरावर अत्यंत प्राधान्याने काम करणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी नाला, खोलीकरण, विहिरीचे पुनर्भरण इत्यादी जलसंवर्धनाचे उपाय सुचवण्यात आले आहेत. दुसरा स्तर पिवळा पट्टात असून त्यात बांध, विहीर पुनर्भरण, शेततळे, पाझर तलाव इत्यादी कामे सुचविण्यात आले आहेत. पुढील तीन स्तरांमध्ये सलग समतोल सर, पाझर चर, दगडी बांध, शेततळे इत्यादी कामे सुचविण्यात आली आहेत.

तुमच्या गावचा भूजल नकाशा असा पहा ऑनलाईन

पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक अश्या सहा विभागाच्या भूजलाचा नकाशा वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन खालीलप्रमाणे नकाशा पाहावा लागेल.

 • सर्वप्रथम तुम्हाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग – जिल्हा – तालुका – गाव अशाप्रकारे निवडून Open Map या बटनावर क्लिक करावे लागेल.
 • बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पीडीएफ डाउनलोड होईल, ज्यामध्ये तुम्ही निवडलेल्या जागेचा भूजल नकाशा व त्यासंदर्भातील उपयुक्त सूचना पीडीएफमध्ये देण्यात आलेल्या असतील.
 • नकाशामध्ये विविध चिन्ह व रंगाच्या माध्यमातून पाण्याची पातळी, नकाशातील रंग त्याचप्रमाणे घ्यावयाच्या उपायोजना दर्शविण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीमध्ये राज्यातील भूजलाची पातळी पाहता, भूजलाची पातळी वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विविध उपाय केले जाऊ शकतात, जश्याप्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या साह्याने प्रत्येकांच्या छतावर यंत्रणा उभारल्यास भूजलाची पातळी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

भूजल नकाशा वेबसाईटयेथे क्लिक करा
विविध योजनांसाठीयेथे क्लिक करा

 1. भुजल नकाशा कसा पहावा ?

  भोजन सर्वेक्षण व विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भूजल नकाशा पाहता येतो.

 2. भुजल नकाशाचा काय उपयोग असतो ?

  भूजल नकाशाच्या साह्याने विशिष्ट ठिकाणच्या पाण्याची पातळी नकाशामध्ये पाहता येते.

 3. भूजल नकाशा व जमिनीच्या नकाशामध्ये काय फरक ?

  भूजल नकाशा विशिष्ट जागेच्या पाण्याची पातळी दर्शवतो, तर जमिनीचा नकाशा जमिनीचे क्षेत्र, एकूण जमीन इत्यादी माहिती दर्शवितो.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment