स्वस्त रेशन धान्य वाटप बंद करण्यासंदर्भातील शासनाकडून एक नुकताच निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील 40 लाख आत्महत्याग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेशन धान्य देण्याची योजना बंद झाली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थी व संबंधित नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. हा विचार करून शासनामार्फत आता धान्य ऐवजी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2 रु. किलो गहू 3 रु. किलो तांदूळ योजना
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या कुटुंबातील नागरिकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 59,000 रु पासून 1 लाखापर्यंत असेल, अश्या नागरिकांना स्वस्त दरात रेशन धान्य म्हणजेच गहू 2 रु. प्रति किलो व तांदूळ 3 रु. प्रति किलो देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती.
♦️ हे सुध्दा वाचा : नवीन रेशन धान्य दुकानासाठी अर्ज सुरू; या जिल्ह्यासाठी
केंद्र सरकारकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात होता; परंतु लाभार्थ्यांना देण्यात येत असेलला गव्हाचा लाभ जुलै 2012 पासून तर सप्टेंबर 2022 पासून तांदूळ वाटपाचा लाभ बंद करण्यात आला.
नेमकी योजना काय आहे ?
रेशन धान्यऐवजी आता या योजनेतून लाभार्थ्यांना प्रतिमहा 150 रु. प्रति व्यक्ती दिलं जाणार आहे. म्हणजेच समजा तुमच्या कुटुंबात एकूण 5 व्यक्ती असतील तर त्यांना दरवर्षी पुढील प्रमाणे 9,000 रु. मिळणार.
150×5 = 750 रु. दरमहा
750×12= 9,000 रु. वार्षिक
अन्नपुरवठा विभागामार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्यात येईल, त्यासंदर्भातील मंत्रिमंडळ लवकरच घेण्यात येईल.
रक्कम कशी मिळणार ?
रेशन धान्य योजनेमध्ये महिलांना कुटुंबप्रमुख मानलं जातं, त्यानुसार कुटुंबातील कुटुंब प्रमुख असलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती ही रक्कम हस्तांतरित करण्यात येईल; परंतु त्यासाठी आधार सलग्न बँक खाता क्रमांक अनिवार्य असेल.
या 14 जिल्ह्यांचा समावेश
- अकोला
- यवतमाळ
- अमरावती
- उस्मानाबाद
- बुलढाणा
- परभणी
- वाशिम
- वर्धा
- नांदेड
- जालना
- औरंगाबाद
- हिंगोली
- बीड
- लातूर