Insurance Scheme : LIC ही भारतातील सर्वात मोठी जुनी, विश्वासनीय विमा कंपनी (Insurance Policy Company) असून या कंपनीमार्फत विविध अशा योजना किंवा जीवन विमा पॉलिसी चालविण्यात येतात. यापैकीच कन्यादान पॉलिसी योजनेची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
कन्यादान LIC पॉलिसी काय आहे ?
भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत मुलींसाठी विविध विमा पॉलिसी चालू करण्यात आलेले आहेत. कन्यादान एलआयसी पॉलिसी ही पण; त्यापैकीच एक आहे. पॉलिसीधारकांचा अकस्मात मृत्यू झाल्यास किंवा अन्य कुटुंबावर आर्थिक संकट आल्यास मुलींना आर्थिक मदत मिळावी याअनुषंगाने कन्यादान पॉलिसी योजना आखण्यात आली आहे.
♦️ हे पण वाचा : महिलांना मिळणार उद्योगासाठी 50 लाख; महिला उद्योजक धोरण योजना!
या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारक किंवा पालक आपल्या एका किंवा एकापेक्षा जास्त मुलींचा विमा उतरू शकतात. म्हणजेच एकापेक्षा जास्त मुलींना लाभार्थी म्हणून नामांकित करू शकतात. अकस्मात पॉलिसीधारकांचा मृत्यू झाल्यास वारसदार म्हणून मुलींना पॉलिसीचा लाभ देण्यात येईल.
एलआयसीच्या या विमा पॉलिसीमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी विवाहासाठी व इतर आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
LIC कन्यादान पॉलिसीसाठी वयोमर्यादा
कन्यादान पॉलिसी योजनेचा विमा उतरवत असताना पॉलिसीधारकांचे वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे, तर नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या मुलीचे वय 03 ते 25 वर्षाच्या दरम्यान असावे. पॉलिसी मुदती विषयी अधिक माहिती तुम्ही विमा एजंटकडून मिळवू शकता.
LIC प्रीमियम किती ?
पॉलिसीधारक व मुलीच्या वयोमानानुसार प्रीमियमची रक्कम कमी जास्त होते. उदाहरणासाठी तुम्ही जर 121 रुपयाचा दररोजचा प्रीमियम भरला, तर तुम्हाला 27 लाखापर्यंतचा लाभ मिळू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्हाला तुमच्या जवळील एलआयसी शाखेला भेट द्यावी लागेल.
LIC कन्यादान पॉलिसी डॉक्युमेंट्स
- आधारकार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट फोटो
- लागणाऱ्या फॉर्मचा नमुना
- मुलीचा जन्माचा दाखला
- वडिलांचा आधारकार्ड
- बँक पासबुक
एलआयसी कन्यादान पॉलिसी PDF Application फॉर्म
इच्छुक अर्जदारांना एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जवळील एलआयसी शाखेला भेट द्यावी लागेल किंवा गावातील एलआयसी एजंटला संपर्क करून अर्जदार फॉर्म भरू शकतात. या पॉलिसी संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.
LIC अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
LIC कन्यादान पॉलिसी | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे नक्की भेट द्या |
LIC कन्यादान योजना काय आहे ?
मुलीच्या शैक्षणिक, वैवाहिक जीवनाची सुरक्षितता लक्षात घेऊन एलआयसीमार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना.
LIC कन्यादान योजना कशी काढावी ?
यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील एलआयसी शाखेची अथवा एजंटशी संपर्क साधावा लागेल.
LIC कन्यादान योजना कोण काढू शकतात ?
एलआयसी कन्यादान योजना 18 ते 55 वर्षातील नागरिक काढू शकतात त्यासाठी त्यांच्या मुलींचं वय 03-25 दरम्यान असावे.