शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला MahaDBT Farmer Portal ला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल.
- महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर तीन उपघटक दिसतील, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन. यापैकी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
- आता योजना निवडण्यासाठी मुख्य प्रक्रिया सुरू होईल या ठिकाणी अशाप्रकारे पर्याय निवडा. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य > मनुष्य चलित अवजारे > फॉरेज ग्रॉस अँड स्ट्रॉ / रेसिडू मॅनेजमेंट (कटर/श्रेडर) > चाफ कटर
- वरीलप्रमाणे पर्याय निवडल्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करा.
- जर तुम्ही नवीन शेतकरी असाल व नोंदणी करून सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज करत असाल तर तुम्हाला २३.६० पैसे इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
- जर तुम्ही यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज केलेला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जनावरांचा चारा कापणीसाठी व सोयीस्कर पद्धतीने चारा कापता यावा यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो आमच्यामार्फत देण्यात आलेली माहिती, जर तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा.