आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती | Aditya Birla Capital Scholarship 2024

By Admin

Updated on:

शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप योजना राबविण्यात येतात. शासनासह इतर संस्था व मंडळाकडूनसुद्धा विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. आदित्य बिर्ला फाउंडेशनकडून राबविण्यात येणारी अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप (Aditya Birla Capital Scholarship) होय. या स्कॉलरशिप बद्दलची संपूर्ण माहिती आपण प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Aditya Birla Capital Scholarship

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याअंतर्गत समाविष्ट फाउंडेशन कंपन्यांकडून 2024-25 या वर्षात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रोग्राम अर्ज सुरू करण्यात आलेला आहे. संबंधित स्कॉलरशिप प्रोग्राम संपूर्णतः आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येईल.

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिपच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या किंवा पदवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असेल, त्यांना स्कॉलरशिप म्हणून आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासामध्ये सवलत, शाळेच्या फीसमध्ये सवलत व इतर शैक्षणिक खर्चासाठी या फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कॉलरशिप Scheme सुरू करण्यात आली आहे.

Aditya Birla Capital Foundation

आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन (ABCL) ही बिर्ला समूहाची वित्तीय सेवा व्यवसायाची होल्डिंग कंपनी असून या फाउंडेशन अंतर्गत आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, क्रीडा व इतर क्षेत्रांमध्ये विविध निधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते. आदित्य बिर्ला समूहाचा हा अनोखा उपक्रम समाजातील गरजू व्यक्तींसाठी खूपच मुलाचा आणि महत्त्वकांक्षी आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप पात्रता (eligibility)

 • अर्जदार विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.
 • अर्जदार विद्यार्थ्यांना मागील इयत्तामध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
 • आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिपसाठी बिर्ला कंपनीतील कर्मचाऱ्यांची मुलं किंवा मुली पात्र असणार नाहीत.

कोणत्या विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती ?

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालावधीनुसार त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. कोणत्या इयतेत्तील विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार ? त्यासाठी तुम्ही खालील तक्ता पाहू शकता. Aditya Birla Capital Scholarship अंतर्गत देण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिप रक्कमेचा उपयोग विद्यार्थी शैक्षणिक फीस, हॉस्टेल फीस, कॅन्टीन फीस, इंटरनेट, विविध शैक्षणिक उपकरण, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाइन लर्निंग इत्यादी विविध बाबीसाठी करू शकतात.

इयत्ताशिष्यवृत्ती रक्कम
पहिली ते आठवीरु. 18,000/-
नववी ते बारावीरु. 24,000/-
पदवीरु. 36,000/-

निवड प्रक्रिया (Selection Process)

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2023-24 साठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया बहुस्तरीय पद्धतीने केली जाईल. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी समजून घेतली जाईल, त्यानंतर निवड प्रक्रियेसाठी खालील टप्प्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

 • शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारावर उमेदवारांची निवड यादी
 • कागदपत्रांची पडताळणी
 • कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांशी फोनवर मुलाखत
 • स्कॉलरशिप नियुक्ती करून विद्यार्थ्यांची अंतिम निवड

Aditya Birla Capital Scholarship Required Documents (कागदपत्रे)

 • विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक
 • ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • उत्पन्नाचा दाखला
 • चालू वर्षातील दाखल्याचा पुरावा (ऍडमिशन पावती/बोनाफाईड/शाळा/कॉलेज ओळखपत्र, फीस पावती

अर्जासाठी शेवटची तारीख (Last Date)

विद्यार्थ्यांना आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास शेवटची मुदत 30 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सदर स्कॉलरशिप साठी विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अद्याप कागदपत्र उपलब्ध नसल्यास फारच प्रक्रिया आत्ताच चालू झाले असल्यामुळे आणखी भरपूर वेळ आहे. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्र काढून घेऊन त्वरित अर्ज करावा. इतर आवश्यक अपडेट व वेळापत्रकासाठी (Timetable) विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Online Application Process

 1. आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 2. वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्यासमोर Apply Now असा बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून लॉगिन करून घ्या, आवश्यकता असल्यास रजिस्ट्रेशन करून त्यानंतर लॉगिन करा.
 3. लॉगिन केल्यानंतर बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2024-25 चा Application Form तुमच्यासमोर उघडेल. आता स्टार्ट अप्लिकेशन या बटणावर क्लिक करा.
 4. विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरून घ्या. त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करा.
 5. शेवटच्या टप्प्यात Terms & Conditions यावर टिकमार्क करून तुमच्या अर्जाची एक वेळेस तपासणी करा.
 6. तुमच्याकडून भरण्यात आलेली सर्व माहिती बरोबर असल्यास Submit या बटनावर क्लिक करून तुमचा अंतिम अर्ज दाखल करा.
 7. अशा पद्धतीने तुमचा एप्लीकेशन फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण भरून झालेला असेल. भविष्यकाळातील कामासाठी त्या फॉर्मची पीडीएफ किंवा प्रिंट-आऊट काढून तुमच्याजवळ ठेवा.
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
इतर शैक्षणिक योजनायेथे क्लिक करा

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया कशी असेल ?

आदित्य बिर्ला स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया कश्याप्रकारची आहे. यासंदर्भात वरील लेखात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिपसाठी उमेदवारांना कमीत कमी टक्केवारी किती असावी ?

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप साठी अर्जदार उमेदवारांना मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण प्राप्त असावेत.

निवड झाल्यानंतर शिष्यवृत्ती रक्कम कश्याप्रकारे देण्यात येईल ?

विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या पालकांच्या किंवा शालेय संस्थेच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येईल.

विद्यार्थी या स्कॉलरशिप निधीचा वापर कसा करू शकतो ?

विद्यार्थी स्कॉलरशिप निधीचा वापर विविध गोष्टीसाठी करू शकतो. जशाप्रकारे शिक्षण शुल्क, वस्तीग्रह शुल्क, भोजन शुल्क, इंटरनेट, उपकरण, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाईन शिक्षण इत्यादीसाठी.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment