शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. दिनांक 3 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यातील 58 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. संबंधित लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
ग्रामपंचायत घरकुल यादी 2022
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी घरकुल बांधकाम मान्यता देण्यात आलेली असून याची नवीन मान्यता यादी शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. संबंधित लाभार्थ्यांना निधी दिला जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांची संपूर्ण यादी या लेखाच्या शेवटी शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. संबंधित शासन निर्णय (GR) खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना घर बांधण सहजासहजी शक्य होत नाही, त्यामुळेच राज्य शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी घरकुल उपलब्ध करून देण्यात येतं. खेड्यातील अनेकजण आपल्याला घरकुल कधी मिळेल याकडे लक्ष ठेवून असतात; परंतु घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना नोंदणी करावी लागते, त्यानंतर घरकुल योजना यादीमध्ये नाव आल्यास शासनाच्या नियम व अटीनुसार लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येतं.
कोणती यादी | ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 |
लाभार्थी वर्ग | महाराष्ट्रातील नागरिक |
लाभार्थी जिल्हा | जालना (महाराष्ट्र) |
लाभार्थी संख्या | एकूण 58 लाभार्थी |
शासन निर्णय दिनांक | 03 नोव्हेंबर 2023 |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संबंधित शासन निर्णयामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभार्थ्यांची नावे देण्यात आलेली आहेत. खाली देण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये शेवटच्या पानावर कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, अश्या संपूर्ण लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहण्यास मिळेल.
मोबाईलवर घरकुल यादी पहा
सध्याच्या स्थितीतला खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर केला जात आहे. त्यामुळे शासनाकडून घरकुल यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट विकसित करण्यात आलेली असून नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना यादी त्यांच्या मोबाईलवर घरबसल्या पाहता येणार आहेत.
घरकुल योजना यादी कशाप्रकारे पहावी? यासाठी तुम्ही खाली देण्यात आलेल्या रखाण्यातील येथील लिंकवर क्लिक करू शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला घरकुल योजना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या ग्रामपंचायतला किंवा तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीला संपर्क साधू शकता, त्याठिकाणी तुम्हाला घरकुल योजना संदर्भात अधिकची माहिती मिळेल.
शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
घरकुल यादी मोबाईलवर | येथे क्लिक करा |