शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून सतत विविध प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये नवनवीन योजनांचा, उपक्रमांचा व अभियानाचा समावेश असतो. यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना
राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांना पाळीव प्राण्यांपासून उत्पादन वाढीसाठी पडीक जमिनीवर वैरण उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100% अनुदान दिलं जात. शेती व्यवसायसोबत अश्या शेतीपूरक इतर व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पशुधन अभियान राबविल जात आहे. या अभिनयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा मानस आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत फक्त वैरणच नाही, तर खाद्य अभियान सेसुध्दा राबविले जातात. यामध्ये वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती, कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत.
| योजनेचे नाव | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | पशुसंवर्धन विभाग |
| लाभार्थी | शेतकरी वर्ग |
| लाभस्वरूप | विविध घटकांसाठी आर्थिक सहाय्य |
| अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
राष्ट्रीय पशुधन योजना पात्रता
- लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
- केवायसीसाठी सर्व आवश्यक कागदपत्र लाभार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी अर्जदारांकडे जमीनपट्टा असणे आवश्यक आहे.
वैरण उत्पादनासाठी बियाणांचा पुरवठा
वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मका, बाजरी, बरसीम, हायशुगर, आटा, ज्वारी इत्यादी सुधारित बियाणांचे वाटप शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर करण्यात येईल. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना गावपातळीवर वारंवार सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती दिली जात आहे.
100 टक्के अनुदान
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वैरण शेतीसाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान दिल जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पदरचा एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबविल जातं. या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे विहित नमुन्यातील अर्ज करावा किंवा अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने NHM पोर्टलवर अर्ज करता येतो. अनुदानावर वैरण, बियाण्याच्या पुरवठ्याबाबत मागणी अर्ज, अर्जदाराच संपूर्ण नाव, गाव, तालुका त्याचप्रमाणे अर्जदारांची शेती बागायती आहे का? असेल तर किती ? इत्यादी माहिती अर्ज करताना द्यायची आहे.
| शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी पोर्टल | येथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : सदर योजनेअंतर्गत विविध उपघटक येतात, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप, संकरित किंवा सुधारित गोवंश जोपासण्यासाठी अर्थसहाय्य, मुरघास निर्मितीसाठी अर्थसहाय्य, मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33 टक्के अनुदान इत्यादींचा समावेश आहे; परंतु आपण या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैरण अनुदानासंदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर उपघटकाची माहिती तुम्हाला हवी असेल, तर सदर शासन निर्णय वरील रखण्यात देण्यात आलेला आहे.