बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना; इतकं मिळणार अनुदान; BBF तंत्रज्ञान, पेरणीयंत्र, लागवड

By Admin

Updated on:

BBF Machine Subsidy | बीबीएफ ही पेरणी करण्याची एक आधुनिक पद्धत असून याची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहायाने केली जाते. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आता बीबीएफ पेरणी यंत्रसुद्धा शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर खरेदी करता येणार आहे.

BBF पेरणी यंत्र अनुदान योजना

नुकताच 25 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनामार्फत मागेल त्याला योजना या संकल्पनेचा GR निर्गमित करण्यात आल्या ज्याअतर्गत मागेल त्याला BBF पेरणी यंत्राचासुध्दा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदान तत्वावर बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहुयात.

बीबीएफ पेरणी पद्धतीचे फायदे

  • पावसाचे पाणी सऱ्यामध्ये मुरते त्यामुळे त्यामुळे त्याठिकाणी पाण्याचे संवर्धन होऊन दीर्घकाळासाठी याचा फायदा होतो.
  • अधिकच्या मोठ्या पावसामुळे पाण्याचा योग्य निचरा होऊन रुंद वरांबा तसेच दोन्ही बाजूंनी सरी यामुळे पिकासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
  • मजुरांची तसेच वेळेची जवळपास 50-60 टक्के बचत होते.
  • सरासरी प्रतिदिन 5-6 हेक्टर बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करता येते.
  • पिकांतील अंतर जास्त असल्याकारणाने पिकाची अंतर मशागत करणे एकदम सोपे होते.

बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान किती ?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. बीबीएफ पेरणी यंत्रासाठी खरेदी किमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 35 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने MahaDBT फॉर्मर पोर्टलवर्ती अर्ज सादर करावा लागेल.

BBF पेरणी यंत्रासाठी असा करा ऑनलाईन अर्ज ?

बीबीएफ पेरणी यंत्राचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाईल, निवडीनंतर त्यांच्या मोबाईलवरती एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करणे आवश्यक आहे.

बीबीएफ पेरणी यंत्र खरेदी केल्यानंतर त्या पेरणी यंत्राचा GST BILL, शेतकरी करारनामा, हमीपत्र, सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक संपूर्ण कागदपत्राची पडताळणी कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत केली जाईल व पुढील 45 ते 90 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी ट्रान्सफर प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

अर्ज कसा करावा ?येथे पहा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
विविध योजनांसाठीयेथे क्लिक करा

BBF पेरणी यंत्रासाठी किती अनुदान मिळणार ?

BBF पेरणी यंत्रासाठी जास्तीत जास्त 35,000 रु. अनुदान किंवा खरेदी रक्कमेच्या 50% अनुदान देण्यात येणार.

बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

ही बीबीएफ पेरणी यंत्र योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अर्ज कसा करावा ?

बीबीएफ पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन MahaDBT Farmer पोर्टलवर अर्ज करावं लागेल, यासाठीच्या व्हिडिओची लिंक वरील रखान्यामध्ये देण्यात आली आहे.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment