महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती संपूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. शेतकरी नेहमीच पाण्याच्या समस्यांना सामोरे जातात. शेती व्यवसाय करत असताना पुरेशी पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे हाताला आलेल पीकसुद्धा निघून जात. याच सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाकडून पंचायत समिती विहीर योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही वेळी पाण्याची उपलब्धता व्हावी, याकरिता त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 5 लाखापर्यंत थेट आर्थिक मदत केली जाते.
पंचायत समिती विहीर योजना काय आहे ?
पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणारी विहीर योजना ही मुख्यत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरजू शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन विहीर खोदण्यास अनुदान देणे हा आहे.
कामाची संपूर्ण अंमलबजावणी ग्रामपंचायतकडून केली जाते; परंतु तांत्रिक व प्रशासकीय मान्यता पंचायत समिती आधिकाऱ्यांकडून दिली जाते.
🧾 हे पण वाचा : विहीर, गाय गोठा ग्रामपंचायत अर्ज घेत नसल्यास येथे करा ऑनलाईन तक्रार
पंचायत समिती विहीर योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतातील जागेत विहीर खोदण्यासाठी 5 लाखापर्यंत अनुदान दिलं जातं; परंतु हे अनुदान संपूर्णतः जमिनीचा आकार, विहिरीचा प्रकार व त्याठिकाणच्या पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असत.
विहीर योजनेसाठी पात्रता
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- ज्या जमिनीत शेतकऱ्यांना विहीर काढायची असेल, ती जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील.
- यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा जागेची पाहणी केलेला अहवाल आवश्यक असेल.
- संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी अनुदान घेतलेलं नसावं.
पंचायत समिती विहीर योजना यादी
पंचायत समिती स्तरावर कोणत्याही प्रकारची विहीर योजने संदर्भातील यादी तुम्हाला भेटणार नाही. कारण या योजनेची अंमलबजावणी मुळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या (MGNREGA) माध्यमातून केली जाते.
जर तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरील तुमच्या गावातील मंजूर शेतकऱ्यांची यादी हवी असेल, तर तुम्ही मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
विहीर योजना अंतर्गत अर्ज करताना अर्जदारांना काही मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या कागदपत्रांमध्ये अर्जदारांच्या ओळखीचा पुरावा, मालकी हक्क आणि जमीन तपशील इत्यादीची पडताळणी केली जाते. तुम्हाला सुद्धा विहीर योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर खालील यादीतील सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- जमिनीचा 7/12 आणि 8अ उतारा
- अर्जदारांचा आधार कार्ड
- अर्जदारांचा पॅन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- शेतजमिनीचा नकाशा
- चतुर सीमा प्रमाणपत्र
- अर्जदारांचा फोटो व सही
- जातीचा दाखला ( अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास)
विहीर योजना अर्ज (Online Application)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाऑनलाईन पोर्टल किंवा इतर संबंधित सरकारी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज सादर करू शकता. तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असेल, तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन विहिरीसाठी अर्ज करू शकता.
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये अर्ज सादर करावा लागेल. अर्ज तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येईल.
महत्त्वाची सुचना : पंचायत समिती विहीर योजना, मागेल त्याला विहीर योजना, रोजगार हमी सिंचन विहीर योजना या सर्व एकच योजना आहेत, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.