Krushi Seva Kendra Online Apply : लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, आता शेतकऱ्यांना गडबड असेल, रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे, बुरशीनाशके इत्यादी पेरणीपूर्वक साहित्य खरेदी करण्याची. यामध्ये बरेच शेतकरी आपल्या गावातील कृषी सेवा केंद्रात बियाणांची खरेदी करतील.
How to Apply For Krushi Seva Kendra Licence Online
त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गावांमध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास यामधून चांगला नफा उत्पन्न मिळवू शकता. पूर्वी कृषी सेवा केंद्र परवाना मिळविण्याची प्रक्रिया एकदम क्लिष्ट होती; पण सध्या स्थितीत कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळविणे एकदम सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने कृषी सेवा केंद्र परवान्यासाठी अर्ज करू शकता.
गावातील शेतकऱ्यांना किंवा नवयुवकांना खताचे दुकान उघडायचे असेल, तर त्यासाठी परवाना काढणे आवश्यक असते. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीतून व्यवसाय खत दुकान परवाना काढू शकतात. कृषी विभागामार्फत बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादीच्या विक्रीसाठी परवाना दिला जातो.
मित्रांनो, आता तुमच्या मनात कृषी सेवा केंद्राविषयी असंख्य प्रश्न असतील ? जशाप्रकारे कृषी सेवा केंद्रासाठी लागणारी कागदपत्र कोणती ? कृषी सेवा केंद्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा ? कृषी सेवा केंद्रासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी ? कृषी सेवा केंद्र परवाना काढण्यासाठी लागणारी फीस ? याबद्दलची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
कृषी सेवा केंद्रासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
कृषी सेवा केंद्र चालकासाठी पुढीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे : बी.एस.सी, कृषी रसायनशास्त्र पदवीधर, कृषीशास्त्र विषयातील पदविका, बी.एससी रसायनशास्त्र पदवीसह पीएचडी किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी यापैकी कोणतेही एक शिक्षण अनिवार्य आहे. खत आणि कीटकनाशक परवानाधारकांकडे यापैकी एकही पदवी नसेल, तर दोन वर्षाच्या आत ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागते.
कृषी सेवा केंद्र परवाना कागदपत्रं
- पॅनकार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशनकार्ड
- बँक पासबुक
- शैक्षणिक कागदपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- ग्रामपंचायतचा दाखला
कृषी सेवा केंद्र लायसन्स काढण्यासाठी लागणारी फीस
- रासायनिक किटकनाशके : 7,500 रु. फीस
- बी-बियाणे लायसन्स : 1,000 रु. फीस
- रासायनिक खते : 450 रु. फीस
कृषी सेवा केंद्र ऑनलाईन परवाना रजिस्ट्रेशन (Licence Online Registration)
कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत “आपले सरकार” वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्याठिकाणी नवीन युजर नोंदणी करून लॉगिन करून घ्यावी लागेल. त्यानंतर कृषी विभाग हा पर्यायी निवडून तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागेल.
📢 हे पण वाचा : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा !
कृषी परवाना सेवा हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील. तुम्हाला ज्या प्रकारचं परवाना लायसन काढायच असेल, तो पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर संबंधित संपूर्ण अर्जाची माहिती भरून तो अर्ज ऑनलाईन दाखल करायचा आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशी करू शकता.
परवाना काढण्यासाठी वेबसाईट | येथे क्लिक करा |