पुढील काही दिवसात खरीप हंगाम सुरू होईल, मग शेतकऱ्याच्या मागे बी-बियाणे, खताचा पाठपुरावा लागलाच म्हणून समजा. या धर्तीवर शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व खत वाटप करता यावा व त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी श्री अन्न अभियान योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.
श्री अन्न अभियान महाराष्ट्र
श्री अन्न अभियान योजनेचा शासन निर्णय (GR) नुकताच निर्गमित करण्यात आलेला असून या अभियानात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत वाटप व कृषी क्षेत्राशी निगडित इतर महत्त्वाच्या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. श्री अन्न अभियान नेमकं काय आहे ? यामधील विविध बाबी कोणत्या ? शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार ? याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.
🔴 हे पण वाचा भाऊ : शेतीसाठी तार कंपाउंड योजना ! 90% अनुदान मिळणार
संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हा वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. त्यानुसार राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम साजरा करण्याच्या अनुषंगाने श्री अन्न अभियान सुरू करण्यात आलेला आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद प्रस्थापित आहे.
शेतकऱ्यांच्या अन्न उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्य विकास साखळी याचा अंतर्भाव असणार आहे. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचावे, यासाठी श्री अन्न-अभियानाची प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून अभियान राबविणार
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात, त्यामधील काही निवडक योजनांचा विविध खालील नमूद बाबींचा लाभ शेतकऱ्यांना श्री अन्य अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
- आत्मा अभियान
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना
श्री अन्न अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खालील बाबीचा मिळणार लाभ
वरील नमूद विविध योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना श्री अन्न अभियानातून विविध बाबींचा लाभ खालीलप्रमाणे देण्यात येईल.
- पीक प्रात्यक्षिके, सुधारित व संकरित बियाणांचे वितरण, विविध यंत्र व कृषी अवजारांचा वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षण
- कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांची वाटप
- पीक वाढीसाठी जैविक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा
- तृणधान्य बियाणे मिनी किट उपलब्ध करून देणे
- हवामानाबद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन
श्री अन्न अभियानास राज्यात मंजुरी
श्री अन्न अभियानाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) 17 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत विविध बाबीसाठी आर्थिक सहाय्य व अनुदान दिलं जाणार आहे. श्री अन्न अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी शासनाकडून 110 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.
श्री अन्न अभियाना संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय व इतर माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.
श्री अन्न अभियान, 🌺 शासनाने सुरू केले, त्या बद्दल शासनाचे मनापासून आभार गरीबांना नक्कीच फायदा होईल धन्यवाद 👏☘️
नक्कीच सर..प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
ग्रामीण भागातील गरीब शेतकरी,यांना श्री अन्न अभियान, याकरिता गाव ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात यावे,ही विनंती.
सर शासनाचा प्रत्येक योजनेमागे दृष्टिकोन हाच असतो; परंतु अनुक्रमे येणाऱ्या स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत यामध्ये तफावत होते व योजना योग्य पद्धतीने राबवली जात नाही.