शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खरीप किंवा रब्बी हंगाम तोंडावर आल्यानंतर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशक इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची (Money) गरज भासते. अशावेळी शासनाकडून शेतकऱ्यांना काही आर्थिक मदतभार लागला, तर सोन्याहून पिवळं !
पेरणीसाठी 10,000 रु. मदत
शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रु. मदत शासनाकडून दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात तुम्ही मागील 2 ते 3 दिवसांमध्ये सोशल मीडिया, न्यूजच्या माध्यमातून माहिती पाहिलेली असेल, याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.
शेतकऱ्यांना आर्थिक (Economic) व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवून आत्महत्या प्रमाण कमी करायचा असेल, तर तेलंगणाच्या धर्तीवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये अनुदान (Subsidy) किंवा आर्थिक मदत द्यावी, अशी शिफारस महसूल प्रशासन राज्यशासनाकडे करणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आलेली आहे.
शेतकरी कुटुंब सर्वेक्षणावरून निष्कर्ष
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून भरपूर प्रयत्न करण्यात आले; परंतु करण्यात आलेल्या उपायोजना काही प्रमाणात वाया गेल्या. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जवळपास 21 लाख शेतकरी कुटुंबाचा सर्वे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांचा सर्वे पूर्ण झालेला असून, जून अखेरपर्यंत संपूर्ण सर्वे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी शिफारस करण्यात येणार आहे.
सर्वेमधून समोर काय आले ?
सध्यास्थितीत शेतकऱ्यांची मानसिक स्थिती कशी आहे ? यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतात का ? याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सत्यता पडताळण्यासाठी 4 शेतकऱ्यांना कार्यालयात बोलवण्यात आले, त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यांना आर्थिक समस्या असल्याची बाब समोर आली, ज्यामध्ये मुलीचे लग्न, सावकारी कर्ज, पेरणीप्रश्न, पीक पिकत नाही, शेतमालाला कमी भाव इत्यादीचा समावेश होता.
📢 हे पण वाचा : फळपिकांना 3 लाखापर्यंत कर्ज देणारी योजना; पहा संपूर्ण माहिती
वरील सर्व बाजूचा विचार करता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणाच्या धरतीवर शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात एकरी 10 हजार रु. अनुदान देण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. लवकरच शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेईल, अशी आम्ही आशा करतो.
🌾 शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
🔔 सरकारी योजना | येथे क्लिक करा |
🔰 शासन निर्णय | येथे क्लिक करा |
⚖️ रेशन न्यूज | येथे क्लिक करा |
१०,०००/-रु.मिळनार शेतकरी बांधवांना, पेरणी अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शासनाचे मनापासून आभार गरीबांना नक्कीच फायदा होईल धन्यवाद 👏