तुम्हाला रेशन किती मिळालं आता मोबाईलवर कळणार ! अन्नपुरवठा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

By Admin

Published on:

Ration Card Mobile Linking : रेशनकार्डधारक नागरिकांना आता रास्तभाव दुकानातून किती धान्य मिळालं ? हे मोबाईलवरती कळणार आहे. रेशनकार्ड धारकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर दरवेळी रेशन घेतल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून किती रेशन मिळालं, याबाबतचा संदेश मोबाईलवरती पाठवण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लवकरच जोडण्यात येणार आहे.

मोबाईलवर कळणार किती मिळालं धान्य

अन्न पुरवठा विभागामार्फत नागरिकांसाठी सतत नवनवीन उपक्रम, योजना राबविल्या जातात. यामध्ये असाच एक महत्त्वपूर्ण बदल करून अन्न पुरवठा विभागाच्या नवीन नियोजनानुसार लाभार्थ्यांना किती धान्य मिळालं. हे त्यांच्या मोबाईलवरती समजणार आहे.

♦️ हे पण वाचा : या व्यक्तीचं रेशनकार्ड होणार बंद ! नवीन नियम पहा

यापूर्वी रेशनकार्डधारक नागरिकांना आपलं रेशन इतर कुणाला वाटप झालं की काय याची माहिती मिळत नव्हती; परंतु अन्नपुरवठा विभागाच्या या नवीन अद्ययावत प्रणालीमुळे धान्य वाटप झाल्यानंतर त्वरित रेशनकार्डधारक व्यक्तीच्या मोबाईलवरती एसएमएस येणार आहे.

यामुळे रास्तभाव दुकानातून व्यक्तीला किती धान्य वाटप झालं, याची माहिती डिजिटल स्वरूपात मिळेल. यामुळे रास्तभाव दुकानदाराकडून होत असलेली नागरिकांची फसवणूक, त्याचप्रमाणे नागरिकांच्या मनात असलेला गैरसमज नक्कीच दूर होईल. अशी माहिती अन्नपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.

रेशनकार्डशी मोबाईल नंबर लिंक केलात का ?

आता या अन्नपुरवठा विभागाच्या नवीन निर्णयामुळे लवकरच रेशन कार्डधारक कुटुंबाच्या एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक रेशनकार्ड सोबत लिंक केला जाणार आहे यामुळे दरमहा मिळणाऱ्या रेशन धान्याची माहिती नागरिकांना मोफत एसएमएसच्या स्वरूपात मोबाईलवरती प्राप्त होईल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

3 thoughts on “तुम्हाला रेशन किती मिळालं आता मोबाईलवर कळणार ! अन्नपुरवठा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय”

Leave a Comment