शेतकऱ्यांना मे महिन्यात 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार; तत्पूर्वी हे महत्त्वाचं काम करून घ्या !

By Admin

Published on:

नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत मिळावी, यासाठी केंद्रसरकारकडून 2019 मध्ये एक महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ती योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan). शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना सुरुवातीला नागरिकांना तितकी महत्त्वाची वाटली नाही; परंतु कालांतराने अल्पावधीतच ही योजना लोकप्रिय झाली.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

पीएम किसान सन्मान निधी योजनेची लोकप्रियता पाहता नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारमार्फत अशीच एक योजना राबविण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली. नवीन योजनेला नाव देण्यात आलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.

🔔 हे पण वाचा : या ठरावीक जिल्ह्यामधे कुसुम सोलारपंपाचा कोठा उपलब्ध

राज्यशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये ऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रु. व नमो शेतकरी सन्मान निधी योजनाअंतर्गत 6,000 रु. असे वार्षिक एकूण 12,000 रु. मिळतील.

योजना सुरू झाल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांनकडून चर्चा केली जात आहे, की ही योजना फक्त नावापुरतीच, या योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा योजना राबविली जाणार नाही; परंतु लवकरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

हफ्ता केव्हा जमा होणार ?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये ऐवजी चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

हफ्ता मिळविण्यासाठी नोंदणी करावी लागेल का ?

हफ्ता मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागेल का ? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही; परंतु PM किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासून लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR (शासन निर्णय) आला का ?

अद्याप नमो शेतकरी महासन्मान निधीचा कोणताही अधिकृत GR (शासन निर्णय) शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नाही. या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती जशाप्रकारे अर्जाची प्रक्रिया, लाभ घेण्यासाठी च्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्र, पात्र लाभार्थी याबद्दलची संपूर्ण माहिती लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येईल.

नमो शेतकरी योजनेच्या अटी व शर्ती काय असतील ?

सामान्यतः PM Kisan सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेच्या अटी व शर्ती सारख्याच आहेत, तरीसुद्धा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून थोडक्यात माहिती पाहू शकता.

नमो शेतकरी योजनेच्या अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment