मित्रांनो, आपला देश कृषीप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा शेतीवरच अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारमार्फत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
Namo Shetkari MahaSanman Yojana 2023
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. याच धरतीवर राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत द्यावी. यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली.
🔴भाऊ हे पण वाचा : कडबा कुट्टी मशीनसाठी 20 हजारापर्यंत अनुदान मिळणार
शासनाकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रु. मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून PM Kisan Sanman Nidhi योजनेअंतर्गत 6,000 रु. व Namo Shetkari MahaSanman योजनेअंतर्गत 6,000 रु. अशी एकंदरीत 12,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल. त्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. ती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत.
या महिन्यात येणार पहिला हफ्ता
दर चार महिन्याला केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचा हफ्ता वितरित करण्यात येईल. या योजनेचा पहिला हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी वितरित केला जाईल, अशी माहिती दिली जात आहे.
यांना मिळणार नाही लाभ
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नसेल, बँक खात्याला आधार सलग्न (Bank Aadhar Seeding) केलेला नसेल, त्याचप्रमाणे आपल्या मालमत्तेविषयी माहिती संबंधित विभागाकडे दिलेली नसेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी कागदोपत्री तीन टप्पे पूर्ण करावी लागतील.
इतका शासनाला वार्षिक खर्च
कृषी विभागाकडून राज्य सरकारने संबंधित योजनेशी निगडित मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव मागून घेतलेला असून, मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम शिकामोर्तब झाल्यानंतर शासनाला तिजोरीतून जवळपास वर्षाकाठी 5 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
96 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू असल्याकारणाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ राज्यातील जवळपास 96 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठीच्या अटी, शर्ती व पात्रता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असेल.
🌾 शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
🔔 सरकारी योजना | येथे क्लिक करा |
🔰 शासन निर्णय | येथे क्लिक करा |
⚖️ रेशन न्यूज | येथे क्लिक करा |
आमच्या पर्यंत योजना पोहचतच नाही
सर तुमचं पण बरोबर आहे; पण योजनेचा पाठपुरावा केला तर नक्की लाभ मिळतो..
योजनेचा लाभ मिळत नाही
मिळतो सर पाठपुरावा करावा लागतो
2000हप्ता येणार मानतात आणि येत पण नाही
PM किसान सन्मान निधी योजना की महासन्मान निधी योजना
Pm kisan nidhi
?