मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा 1 ला हफ्ता या तारखेला मिळणार : CM Yojana

By Admin

Updated on:

Government Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचासुध्दा लाभ दिला जाणारा असून त्यासंदर्भातील अधिकची माहिती समोर आलेली आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली.

त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू झालेली असून, पुढील मे किंवा जून महिन्यात राज्यातील जवळपास 79 लाख 87 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रु. याप्रमाणे 1,600 कोटी रुपयांची वितरण केली जाणार आहे.

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना पात्रता काय असेल ?

  • 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी शेतजमीन नावावर असावी.
  • शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे इतर निकष मुख्यमंत्री शेतकरी योजनेसाठी लागू असतील.
  • योजनेसाठी कोणत्याही प्रकारची क्षेत्र मर्यादा नाही.
  • फक्त जमीन लागवडीयोग्य असणे आवश्यक आहे.
  • ई-केवायसी व बँक खात्याला आधार लिंक केलेला असावा.

यांना मिळणार नाही लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून e-kyc प्रक्रिया चालू केल्यानंतर तब्बल 1 कोटी 15 लाख पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा चालू हप्ता वितरित करण्यात आला होता.

e-kyc, आधार लिंक व संबंधित मालमत्तेची माहिती न दिल्याकारणाने 36 लाख शेतकऱ्यांना मागील हप्त्याचा लाभ देण्यात आलेला नाही. हीच बाब मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लागू असेल. येणारा 14 वा हप्तासुद्धा तितक्याच पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल.


मोफत टॅबलेट योजनायेथे क्लिक करा
गॅस सबसिडी योजनायेथे क्लिक करा
एक शेतकरी एक डीपी योजनायेथे क्लिक करा
ऊस तोडणी यंत्र अनुदानयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

1 thought on “मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा 1 ला हफ्ता या तारखेला मिळणार : CM Yojana”

Leave a Comment