मित्रांनो, सन 2022-23 या वर्षासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठीचे अर्ज काही दिवसापूर्वी पात्र अर्जदारांमार्फत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते.
Mahamesh Yojana Antim Niwad Yadi 2023
बहुतांश शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता; ऑनलाईन अर्ज भरणा करून खूप दिवस होऊनसुद्धा याची अंतिम पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती.
🔴 हे पण वाचा : दुधाळ गाय, म्हैस वाटपास शासनाची मजुरी; पहा शासन निर्णय
शेतकरी यादीची आतुरतेने वाट पाहत होते. अशा सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. शेळी व मेंढी पालन महामेष योजनेची अंतिम यादी पशुसंवर्धन विभागामार्फत दिनांक 26 एप्रिल 2023 दिवशी अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनाअंतर्गत सन 2022-23 साठी जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असेल, तर यादीमध्ये तुमचं नाव आला आहे का किंवा तुम्ही महामेष योजनेसाठी पात्र आहात का ? यासाठी तुम्ही देण्यात आलेल्या यादीमध्ये तुमचं नाव पाहू शकता.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतिम निवड यादी कशी पहावी ?
शेळी व मेंढी पालन योजनेची अंतिम निवड यादी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट महामेष यावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विविध जिल्ह्यांच्या निवड याद्या तुम्ही पीडीएफ स्वरूपात पाहू शकता.
- तुमच्या मोबाईलवरून खाली देण्यात आलेली पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट उघडा.
- लाभार्थ्यांची प्राथमिक व अंतिम निवड यादी हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्याठिकाणी खालीलप्रमाणे दोन पर्याय दिसतील.
- लाभार्थ्यांची प्राथमिक यादी
- लाभार्थ्यांची अंतिम यादी
- लाभार्थ्यांची अंतिम यादी या पर्यायावर क्लिक करा एक नवीन पेज उघडेल त्याठिकाणी तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या अंतिम PDF याद्या डाऊनलोड करता येतील.
यादी डाऊनलोडसाठी | येथे क्लिक करा |
यादी डायरेक्ट लिंक | येथे क्लिक करा |
विविध योजनांसाठी | येथे क्लिक करा |
यशवंतराव चव्हाण महामेश योजना करिता पंचायत समिती मार्फत अज केला होता पण आता पर्यंत माझे नाव यादीत आले नाही,