महाबीज सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भात दर/भाव 2023 : Mahabeej Soyabean Rate 2023

शेतकरी मित्रहो, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सन 2023 या चालू वित्तीय वर्षात सोयाबीनच्या विविध वाणांचा दर महाबीजकडून निश्चित करण्यात आलेलं आहे. सोयाबीन दर तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. 👇

बियाणाच वाणबॅग /किलोरक्कम
फुले किमया (KDS-753) फुले संगम (KDS-726) Maus-162 Maus-61230 किलोची बॅगरु. 2,040/-
महाबीज : JS-9305, DS-228, MAUS-71, JS-33530 किलोची बॅगरु. 2,730/-
MAUS-158, Macs-1188, Macs-128130 किलोची बॅगरु. 3,060/-

शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसह तूर, मूग, उडीद, भात, सूर्यफूल, व इतर खरीप हंगामातील जी पीक असतात त्या सर्व पिकांचे दर निश्चित करण्यात आली आहेत. तुम्ही खालीलप्रमाणे दर पाहू शकता.

उडीद बियाण भाव : एकयू 10-1 (ब्लॅक गोल्ड), टीएक्यू-1 ( 2 किलो बॅगचा दर 350 रु. तर 5 कीलोसाठी 850 रु.)

मूग बियाण भाव : उत्कर्षा, पीकेव्हीएम-4, बीएम-2003-2 व इतर वाण- 2 किलो बॅगचा दर 360 रु. तर ५ किलो बॅगसाठी 875 रु. दर असेल.

भात वाण दर/भाव : भाताच्या विविध वाणामध्ये इंद्रायणी या वाणाच्या 10 किलो बॅगसाठी 660 रु. दर आहे, तर 25 किलो बॅगसाठी 1600 इतका दर आहे. याचप्रमाणे कोईमतूर-51 या वाणाच्या 25 किलो बॅगसाठी 1075 रु. इतका दर आहे.

तूर बियाण भाव : तूर या बियाण्यामध्ये बीडीएसन-716, फुले राजेश्वर, पीकेव्ही तारा या वाणाचे 2 किलो बॅग 390 रु. तर बीडीएन-711, बीएसएमआर-736, मारुती, आयसीपीएस-87119 (आशा) या वाणांची 2 किलोची बॅग 360 रुपयात मिळेल.