महाबीज सोयाबीन, तुर, मूग, उडीद बियाणे दर 2023 जाहीर; शेतकरी असला, तर माहिती नक्की वाचा आणि फसवणूक टाळा

By Admin

Updated on:

महाबीज बियाणे दर 2023 : मित्रांनो, सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून मोठ्या जोमाने सुरू आहे. खरीप हंगाम म्हटल की, बी-बियाणे, खत खरेदी, कीटकनाशक खरेदी इत्यादीची धावपळ शेतकऱ्यांच्या मागे लागलेलीच असते. अशावेळी कळत-नकळत शेतकरी बियाणे खरेदीसाठी आगावू रक्कम देऊन बसतो, नंतर शेतकऱ्यांना वाढीव रक्कम दिल्याच कळत.

महाबीजकडून सोयाबीन, तूर, मूग, उडीद दर जाहीर

शेतकरी हा भोळा-भाबडा असतो, त्यामुळे बहुतांश वेळी शेतकऱ्यांना बी-बियाणे जास्त दराने विक्री केले जातात. जाणूनबुजून बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते; कारण शेतकऱ्यांना मुळात बियाणांचा बाजारातील चालू भाव माहित नसतो.

सध्या बाजारात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बियाणांची खरेदी सुरू आहे. या धर्तीवर शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करताना फसवणूक होऊ नये. यासाठी महाबीजकडून विविध बियाणांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. तुम्ही खालीलप्रमाणे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या महाबीज कंपनीच्या बियाण्यांचं चालू वर्षातील दर पाहू शकता.

महाबीजच्या विविध सोयाबीन वाण 2023 बॅगचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment