कन्यादान योजना महाराष्ट्र, लग्नासाठी 20 हजार रु. मिळणार : Kanyadan Yojana Maharashtra 2023

By Admin

Published on:

मित्रांनो, लग्नासाठी शासनाकडून मदत मिळणार अशा प्रकारची एखादी योजना तुम्हाला माहिती आहे का ? जर नसेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आपण कन्यादान योजनेबद्दलची (Kanyadan Yojana) संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

कन्यादान योजना काय आहे ?

लग्न समारंभावर होणारा अपव्यय खर्च टाळण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे कन्यादान योजना होय.

योजना नावकन्यादान अनुदान योजना
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी वर्गनवदाम्पत्य (वधू-वर)
लाभस्वरूप20 रु. हजार आर्थिक मदत
विभागसमाजकल्याण विभाग

कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी जोडप्यांच्या पालकांना 20 हजार रुपये आर्थिक मदत त्याचप्रमाणे विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 4 हजार रुपये इतकी मदत शासनामार्फत केली जाते.

Kanyadan yojana अटी व शर्ती

  • नवविवाहित जोडपं (वधू-वर) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये.
  • कन्यादान अनुदान योजना वधू-वरांच्या प्रथम विवाहासाठीच देण्यात येईल.
  • सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गत लग्न समारंभ पार पाडण्यासाठी कमीत कमी 10 जोडप्याची (20 वर व 20 वधू) आवश्यकता.
  • वधू-वर यापैकी एक किंवा दोघेही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, विशेष मागास वर्गातील असावेत.

योजना कोणासाठी असणार ?

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विविध जातीमधील अर्जदार अर्ज करू शकतात.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • पती-पत्नी ओळखपत्र
  • विवाह नोंदणी दाखला.
  • उत्पन्न दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील दाखला.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • विधवाबाबतीत मृत्यू प्रमाणपत्र.
  • विहित नमुन्यातील अर्ज

कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Kanyadan Yojana मध्ये अर्ज करण्यासाठी विवाहोत्सुक जोडप्यांनी कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा. विवाहानंतर वधू-वर किंवा सामूहिक विवाह संस्था यांच्यामार्फत समाजकल्याण विभागाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो व संबंधित जोडप्याना तसेच संस्थेला अनुदान दिलं जात.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

1 thought on “कन्यादान योजना महाराष्ट्र, लग्नासाठी 20 हजार रु. मिळणार : Kanyadan Yojana Maharashtra 2023”

Leave a Comment