शासनामार्फत राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना (Scheme) व संकल्पना मांडण्यात व सुरू करण्यात आल्या. यादरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी चालू होती, की कांद्यासाठी अनुदान (Subsidy) किंवा योग्य भाव मिळावा.
Kanda Anudan Yojana
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण व मागणी लक्षात घेता, काल दिनांक 13 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना कांद्यासाठी 300 रु. सानुग्रह अनुदान (Subsidy) देण्याची घोषणा केली.
♦️ हे पण वाचा भाऊ : 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 15,000 रु.
बऱ्याच दिवसापासून कांद्याला मिळणारा कमीचा भाव, विरोधक व शेतकरी संघटनांची टीका या सर्व गोष्टीचा तोडगा काढण्यासाठी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला.
कांद्यासाठी 200 ऐवजी 300 रु. अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा सभागृहात या संदर्भातील माहिती देताना बोलले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रु. इतका अनुदान दिलं जावं, अशी वेळोवेळी समितीकडून शिफारस केली जात होती.
परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्यास्थिती पाहता शेतकऱ्यांना यामध्ये वाढीव 200 रु. ऐवजी 300 रु. अनुदान प्रति क्विंटल देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.
♦️ हे पण वाचा : शेतकऱ्यांना फवारणीसाठी मिळणार ड्रोन व इतकं अनुदान
कांदा सानुग्रह अनुदान योजना व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्याच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली जात आहे. कांद्याचे विक्री कोणत्या कालावधीत केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये कांदा अनुदानाचा लाभ (Benefit) देण्यात येईल याबद्दलची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.