नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रु. अनुदान (Onion Subsidy) देण्याची घोषणा करण्यात आली होती.
कांदा अनुदान शासन निर्णय (GR)
शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता त्यामध्ये आणखी 50 रुपयाची वाढ करून एकंदरीत 350 रु. प्रति क्विंटल अनुदान, कांदा (Onion Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती; पण अद्याप त्यासंदर्भातील कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की, कांदा अनुदानासंदर्भातील अटी व शर्ती काय असतील ? कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल ? इत्यादी.
♦️ हे पण वाचा : एक शेतकरी एक डीपी योजना सुरू; 1,500 कोटी निधी मंजूर
या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यासंदर्भातील अधिक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
चालू वर्षातील फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. त्यामुळे विविध शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून कांदा उपाययोजना, अनुदानाची मागणी केली जात होती. त्यासाठी माझी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28/02/2023 रोजी समिती गठीत करण्यात आली होती
अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ?
शासनाकडून कांदा अनुदानास मंजुरी देण्यात आल्यानंतर, बहुतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की, अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी लाल कांदा विक्री केला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनमार्फत घेण्यात आलेला आहे.
कांदा अनुदान शासन निर्णय GR पहा !
कांदा अनुदान योजना अटी व शर्ती
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समिती ही योजना लागू असेल.
- परराज्यातून आवक (आयात) झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू असणार नाही.
- प्रति शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 200 क्विंटल कांदा विक्रीसाठी अनुदान देण्यात येईल.
- सदर अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात (Bank Transfer) हस्तांतरित करण्यात येईल.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी कांदा विक्री करण्यात आलेली पटी, पावती, 7/12 उतारा, बँक बचत खाता क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केली असेल, त्याठिकाणी साध्या कागदावर अर्ज करावा लागेल.