100 रुपयांत मिळणार रवा, दाळ, साखर, तेल : रेशनकार्ड धारकांसाठी गुढीपाडवा आनंदाचा शिधा

By Admin

Published on:

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही रेशन कार्डधारक नागरिक असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील शिधापत्रिकाधारक नागरिकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. नुकतीच मोफत 01 वर्ष राशन देण्यासंदर्भातील योजना शासनामार्फत सुरू करण्यात आली. यापूर्वीसुद्धा दिवाळी बोनस म्हणून 100 रुपयांमध्ये विविध वस्तू रेशनकार्डधारकांना वाटप करण्यात आल्या होत्या.

गुढीपाडवा आनंदाचा शिधा

गुढीपाडवा या सणानिमित्त व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून राज्यातील नागरिकांना शासनाकडून गुढीपाडवा आनंदाचा शिधावाटप केला जाणार आहे. ज्यामध्ये पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयात खालीलप्रमाणे वस्तूंचा वाटप करण्यात येईल.

♦️ हे पण वाचा : आता रेशन धान्यऐवजी मिळणार 9,000 रु. वार्षिक; पहा संपूर्ण माहिती

शासनामार्फतचा गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेला नवा संकल्प नक्कीच नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

काय मिळणार 100 रुपयांत ?

गुढीपाडवा आनंदाच्या शिधा पॅकेजमध्ये 4 वस्तूंचा समावेश असेल, ज्यामध्ये पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 पामतेल दिलं जाईल.

या कार्डधारकांना मिळणार लाभ

आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की या योजनेचा लाभ कोणा-कोणाला मिळणार ? यामध्ये पिवळे रेशन कार्डधारक, केशरी रेशन कार्डधारक, 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी रेशन कार्डधारक, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी इत्यादींचा समावेश असणार आहे.

500 कोटीचा खर्च अपेक्षित

मागील वर्षीच्या दिवाळीत जेव्हा आनंदाचा शिधा वाटप करण्याची योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल 473 कोटी 58 लाख रु. खर्च झाले होते. आता गुढीपाडव्याच्या या शिधा वाटपासाठी सुद्धा जवळपास 500 कोटीचा खर्च अपेक्षित आहे अशी माहिती सूत्रानुसार देण्यात आली.


गुढीपाडवा आनंदाचा शिधा किती रुपयात मिळणार ?

गुढीपाडवा आनंदाचा शिधा पात्र रेशन कार्डधारकांना फक्त १०० रुपयात देण्यात येणार.

आनंदाच्या शिधामध्ये कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असेल ?

गुढीपाडवा आनंदाचा शिधामध्ये १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चणाडाळ व पामतेल इत्यादीचा समावेश असेल.

आनंदाचा शिधा कोणाला वाटत करण्यात येणार ?

वरील नमूद सर्व पात्र रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल.

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

1 thought on “100 रुपयांत मिळणार रवा, दाळ, साखर, तेल : रेशनकार्ड धारकांसाठी गुढीपाडवा आनंदाचा शिधा”

  1. मागील दिवाळीचा शिधा शिल्लक आहे आता देण्यात येणारा शिधा खराब होईल त्याचप्रमाणे घरकुल पण आम्हाला मिळत नाही १५ वर्ष रेकॉर्ड असून सुध्दा .
    जय महाराष्ट्र

    Reply

Leave a Comment