Gas Cylinder Subsidy Scheme : नमस्कार मित्रांनो, मध्यंतरी शासनाकडून गॅसधारक लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर काही रक्कम सबसिडी (Subsidy) म्हणून परत बँक (Bank) खात्यावरती जमा केली जायची; परंतु काही दिवसापासून गॅस सिलिंडरवरती सबसिडी बंद करण्यात आली आहे.
जर तुम्ही सुद्धा एक गॅस सिलिंडरधारक नागरिक असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 दिवशी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे.
2023-24 साठी 7,680 कोटी रु. मजूर
सिलिंडरच्या आंतरराष्ट्रीय दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने मागील वर्षी केंद्र शासनामार्फत लाभार्थ्यांना वर्षाला 12 सिलिंडरवर प्रतिसिलिंडर 200 रु. अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यासाठी साधारणत: 6,100 कोटी इतकी रक्कम मजूर करण्यात आली होती.
♦️ हे पण वाचा : महिलांना ST प्रवासात 50% सूट; येथे पहा शासन निर्णय
चालू वर्ष 2023-24 साठी केंद्र शासनाकडून 7,680 कोटी रु. इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.