राज्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राचा समावेश होता.
गारपीट नुकसान भरपाई 2023
मार्च महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकासह इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनुषंगाने राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले होते.
🔴 हे पण वाचा : अवकाळी पावसाचा GR आला ! या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत
शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांच्या शेती पिकांच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (input subsidy) स्वरूपात एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते.
अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.
27 कोटी 18 लाख इतका निधी
संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून एकंदरीत 27 कोटी 18 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
👇👇👇👇