दुधाळ गाय, म्हैस गट वाटपास शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला ! : फक्त यांनाच मिळणार लाभ

By Admin

Published on:

वंचित गटातील पशुपालकांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यावा, या अनुषंगाने राज्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांच गट वाटप केलं जातं.

दुधाळ गाय, म्हैस गट वाटप योजना 2023

सदरची योजना राज्यात राबविण्यात येत असून प्रति लाभार्थी 02 दुधाळ जनावरांचा एक गट 75 टक्के अनुदानावर (Subsidy) वाटप केला जाणार असून, यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने दुधाळ जनावरे गटवाटप योजनेत बदल करून प्रति गायची किंमत रु. 70,000/- व प्रति म्हशीची किंमत रु. 80,000/- इतकी करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे.

🔴 हे पण वाचा : शेळी गट वाटप योजना 100% अनुदानावर सुरू; फक्त याच जिल्ह्यात

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या (आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरी) लाभार्थी पशुपालक किंवा नागरिकांना 75% अनुदानावर 02 दुधाळ म्हशी / 02 संकरित गाई / 02 म्हशीचा एक गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर योजनेसाठी इच्छुक अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. याबाबतच्या सूचना लवकरच अधिकृत वेबसाईटवरती किंवा विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यात येतील.

गाय म्हशी वाटप अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे

तपशील०२ देशी/०२ संकरीत गायीच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान०२ म्हशीच्या एका गटासाठी देय ७५ टक्के अनुदान
02 दुधाळ जनावरांच्या एका गटाची किंमत (प्रति गाय रु. ७०,०००/- व प्रति म्हैस रु. ८०,०००/- याप्रमाणेरु. १,०५,०००/-रु. १,२०,०००/-
जनावरांच्या किमतीस अनुसरून कमाल १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर) दराने ३ वर्षाचा विमा उतरविणे.रु. १३,६३८/-रु. १४,४४३/-
प्रतिगट एकूण देय अनुदानरु. १,१७,६३८/-रु. १,३४,४४३/-

गाय म्हशी वाटप योजना अनुदान, स्वाहिस्सा व बँक कर्ज

सदरची योजना राज्यात उपरोक्तप्रमाणे सुधारित किमतीनुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात यावी. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना 02 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येईल. ज्यामध्ये गाय गटासाठी 75 टक्के म्हणजेच रु. १,१७,६३८/- किंवा म्हैस गटासाठी रु. १,३४,४४३/- शासकीय अनुदान देय राहील.

अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्यास स्वतः उभारावी लागेल किंवा बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज (loan) घेणाऱ्या (5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बँकेचे कर्ज) याप्रमाणे लाभार्थ्यास योजनाअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीसाठी पात्रता

  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावा.
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य.
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • अल्पभूधारक शेतकरी ( १ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असावा.
  • महिला बचत गटातील लाभार्थी

योजनेच्या अटी व शर्ती

  • सदरची योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.
  • लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, त्याचप्रमाणे तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड करून त्यांनासुध्दा देण्यात येईल.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • लाभार्थीस हा व्यवसाय किमान तीन वर्ष करणे बंधनकारक राहील.
  • लाभार्थ्यांकडे दुधात जनावरांचे पालन करण्यासाठी आवश्यक तितकी जागा उपलब्ध असावी.
  • लाभार्थ्यांनी दुग्ध व्यवसाय/ गो / महिष पालन विषय प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • .

अर्जदारांनी इतर आवश्यक अटी, शर्ती व अधिकच्या माहितीसाठी आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी व त्या संबंधित निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहून घ्यावेत.

शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
विविध योजनांसाठीयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment