600 रु. ब्रास वाळुसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

मित्रांनो, वाळूच्या ऑनलाईन अर्जासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाखानिजच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल.

  • महाखनिजच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्या सोयीनुसार भाषा निवडून द्या.
  • भाषा झाल्यानंतर अर्ज या पर्यायावर क्लिक करा, त्या ठिकाणी तुम्हाला परत दोन पर्याय दिसतील. 1) आंतरराज्य खनिज परिवहन 2) तात्पुरता प्रस्ताव
  • यापैकी तात्पुरता प्रस्ताव या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर काही सूचना येतील त्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • त्यानंतर Signup या पर्यायवर क्लिक करून मूलभूत माहिती टाकून तुमचा युजरनेम व पासवर्ड तयार करून घ्या.
  • नोंदणी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर Username व Password पाठविण्यात येईल.
  • Sign-in या पर्यायवर क्लिक करून युजरनेम, पासवार्ड, कॅप्तचा टाकून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर रिवेन्यू डिपार्टमेंटचा डॅशबोर्ड दिसेल. आता उजव्या बाजूला Online Application दिसेल यावर क्लिक करा.
  • आता या ठिकाणी वाळू संदर्भातील विविध प्रकारचे अर्ज दिसतील. त्यापैकी एकावर क्लिक करून अर्ज करा.

अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या प्रकारे तुम्ही वाळूसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.