ऑनलाईन आधारकार्ड अपडेट आता मोफत करा; ही आहे शेवटची तारीख : Online Aadhar Update Free of Cost

By Admin

Updated on:

जनसामान्य नागरिकांची ओळख पटवून देणारा सध्या स्थितीमध्ये एकमात्र ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड होय. शासकीय कामकाज, वैयक्तिक कामकाज, कर्ज प्रकरण अशा बहुतांश ठिकाणी आधारकार्ड शिवाय आपलं काम होतच नाही.

आपला आधारकार्ड अपडेटेड असणं खूपच महत्त्वाचा आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, ऑनलाईन आपल्याला आधारकार्ड मोफत कशाप्रकारे अपडेट करता येतो याबद्दलची थोडक्यात माहिती.

आधार अपडेट 14 जूनपर्यंत मोफत

आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल, म्हणजेच तुमचा आधारकार्ड अपडेट करायचा असेल, तर शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा 14 जून 2023 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आधारकार्डधारक नागरिकांना त्यांचा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन शुल्क आकारला जाणार नाही.

आधार अपडेटचा फायदा काय ?

  • आधारकार्ड हा जनसामान्य नागरिकाचा ओळखपत्र असून शासनाकडून नागरिकांना आधार उपलब्ध करून जवळपास 12 वर्षाचा कालावधी उलटून गेला, या दरम्यान बऱ्याच नागरिकांच्या नावांमध्ये, पत्त्यामध्ये बदल झालेला आहे.
  • आपल्या ओळखपत्राची सुरक्षा तितकीच महत्त्वाची, ही बाब ओळखून UIDAI कडून सर्व नागरिकांना आपला आधारकार्ड अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • आधार अपडेटमुळे व्यक्तीची सध्याची स्थिती जसे नाव, जन्मतारीख, रहिवासी पत्ता इत्यादी माहिती अद्ययावत राहील. त्यामुळे नागरिकांना आधारकार्ड आवश्यक असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
  • आधार अपडेटसाठी पूर्वी खूप वेळ लागायचा; परंतु UIDAI कडून सर्व्हर अपडेशन व ऑनलाईनचा वाढता वेग यामुळे आता आधार अपडेट होण्यास पूर्वीसारखा वेळ लागत नाही.

आधार अपडेटसाठी पूर्वी 25 रु. शुल्क, सध्या फुकटात अपडेट होणार

नागरिकांना आधारकार्ड अपडेट करण्यासाठी यापूर्वी ऑनलाईन 25 रु. इतका शुल्क आकारला जायचा तर, महा ई-सेवा केंद्रावर आधारकार्ड अपडेट करायचा असल्यास 50 रु. इतका शुल्क आकारला जायचा; परंतु शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना आधार अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क भरावा लागणार नाही.

♦️ हे पण वाचा : आता बँक खात्याला आधार लिंक सुविधा गावातच

ज्या नागरिकांनी आपला आधार अपडेट केलेला नसेल किंवा त्यांच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती असेल, तर अशा नागरिकांसाठी ही चांगली संधी असून ऑनलाईन मोफत त्यांना आधारकार्ड अपडेट घरबसल्या करता येणार आहे.

Aadhaar Update असा करा

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार अपडेट करण्यासाठी UIDAI च्या myaadhaar portal या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Login या पर्यायावर क्लिक करून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक व captcha टाकून लॉगिन करून घ्याव लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर Document Update या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • पुढे तुम्हाला तुमच्या आधारकार्ड वरील नाव, जन्मतारीख, पत्ता दाखविला जाईल. व्हेरिफाय करून Next या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला आधार lकार्ड व्यतिरिक्त कोणताही इतर ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रं अपलोड करायचा आहे. जशाप्रकारे ड्रायव्हिंग लायसन, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट इत्यादी

अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा तुमचा आधारकार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता. आधार अपडेटसाठी फॉर्म सबमिट केल्यानंतर एक URN क्रमांक तयार होईल, त्या URN क्रमांकाच्या आधारे तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.

आधार अधिकृत पोर्टलयेथे पहा
आधार अपडेटयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

3 thoughts on “ऑनलाईन आधारकार्ड अपडेट आता मोफत करा; ही आहे शेवटची तारीख : Online Aadhar Update Free of Cost”

Leave a Comment