Government Scheme : मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत 15 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील गोरगरीब नागरिकांना फोर्टीफाईड तांदूळ 01 एप्रिल 2023 पासून वाटप करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. त्या योजनेची सुरुवात आजपासून सुरू होणार आहे, याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पोषणयुक्त तांदूळ वाटप योजना
आपल्या कृषीप्रधान देशांमध्ये जवळपास प्रत्येक दुसऱ्या महिलेला ॲनिमिया आहे, तर प्रत्येक चौथा मुलगा कुपोषणाने ग्रासलेला आहे. ही बाब लक्षात घेता देशातील नागरिकांना पोषणयुक्त अन्न उपलब्ध व्हावा.
♦️ हे पण वाचा : या व्यक्तीचं रेशनकार्ड रद्द होणार ! पहा संपूर्ण माहिती
या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत राज्यातील नागरिकांना रेशन धान्याच्या माध्यमातून पोषणयुक्त तांदूळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.
पोषणयुक्त तांदूळ वाटपाची योजना (Fortified Rice Distribution Scheme) आजपासून राज्यात सुरू झालेली असून योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तींना पोषणयुक्त तांदूळ रास्तभाव रेशन दुकानदाराच्या मदतीने आजपासून वाटप केलं जाणार आहे.
फोर्टीफाईड (पोषणयुक्त) तांदूळ काय असतात ?
फोर्टीफाईड तांदूळ म्हणजेच पोषणयुक्त तांदूळ होय. या तांदळामध्ये आयर्न, विटामिन B-12, फॉलिक ऍसिड अशा प्रकारची विविध पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात, यामुळे अश्या तांदळाची न्यूट्रिशनल वैल्यूसुद्धा जास्त असते. अशा तांदळाचा जेवणात वापर केल्याने कुपोषण कमी होते. कुपोषण कमी करण्यासाठीच फोर्टीफाईड तांदळाचा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात येत असलेल्या फोर्टीफाईड तांदूळ योजनेमध्ये फक्त अंत्योदय, एकल निराधार, अपंग या श्रेणीतील शिधापत्रिकाधारकांना पोषणयुक्त तांदूळ वाटप योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
महिला उद्योजक योजना | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री सन्मान योजना | येथे क्लिक करा |
कांदा अनुदान योजना | येथे क्लिक करा |
एक शेतकरी एक DP Yojana | येथे क्लिक करा |