आता तुमच्या मोबाईलवर पहा; अवकाळी पाऊस तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार ?

By Admin

Published on:

मित्रांनो, बदलत्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे; कारण हवामानाविषयी अनिश्चितता झाल्यामुळे, हवामानाची अचूक व योग्य माहिती मिळत नाही; परिणामी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, मात्र यापुढे शेतकऱ्यांवर अशी वेळ येणार नाही.

मौसम ॲपवर काय कळणार ?

शेतकऱ्यांना हवामानाची योग्य माहिती मिळावी, याकरिता भारतीय हवामान विभागामार्फत ‘मौसम’ हे अँड्रॉइड ॲप सुरू करण्यात आलेले असून मौसम या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना सात दिवसापूर्वीच वीज, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यासारख्या हवामानाच्या बदलत्या इशाराबद्दल मोबाईलवरती माहिती मिळणार आहे.

♦️ हे पण वाचा : पीक नुकसान भरपाई नियमात मोठा बद्दल ! शेतकरी असाल, तर नक्की वाचा

मौसम या ॲपची महत्त्वाची विशेषता म्हणजे शेतकऱ्यांना सर्व हवामानाची माहिती आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये व इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी समजणारी व एकदम सोपी असल्यामुळे माहिती अवगत होण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

वरील हवामान बदलासह मौसम ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा वेग, पर्जन्यमान, सूर्योदय, चंद्रोदय, चंद्रास्ताच्या वेळा, ढगांची स्थिती इत्यादी चालूमधील माहिती दिवसातून 8 वेळा या ॲपच्या मदतीने पाहता येणार आहे.

असा डाऊनलोड करा मौसम ॲप

मौसम ॲप तुमच्या मोबाईलमध्ये सहजरीत्या तुम्ही गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. त्यासाठी Mausam हा किवर्ड गुगल स्टोअरमध्ये टाकून सर्च करायचा आहे, त्यानंतर संबंधित ॲप डाउनलोड करायचा आहे. या ॲपच्या मदतीने देशातील जवळपास 200 शहराच्या हवामानासंदर्भातील माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. सोबतच दिवसातून आठ वेळेस हवामान बदलाची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर दाखवण्यात येईल.

शेतकऱ्यांनो “मौसम” पाहून आता शेती करा

हवामान बदलाची अचूक माहिती देणाऱ्या या ॲपमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसून येत आहे. स्थानिक गावपातळीवरील किंवा शेतकऱ्यांच्या राहत्या स्थानाची माहिती शेतकऱ्यांना सात दिवसांपूर्वीच मोबाईलवरती पाहता येत आहे. त्यामुळे शेतीविषयी सर्व कामे जश्याप्रकारे काढणीवर आलेले पीक गारपीट किंवा वादळ, पावसापूर्वी काढून घेणे किंवा पावसाचा अंदाज बघून पेरणी करणे व होणारे नुकसान टाळणे या बाबी शेतकऱ्यांना सोप्या व सोयीस्कर ठरणार आहेत.

शेतकऱ्यांनी पीकपेरणी पासून पीक काढणीपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये या ॲपचा योग्य पद्धतीने वापर करून आपली होणारी पिकाची नुकसानी वाचवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती व्यवसाय करावा, असा आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना केला जातं आहे.

मौसम ॲप डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
विविध योजनांची माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment