अवघ्या काही दिवसातच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होईल. सध्यास्थितीत शेतकऱ्यांची चालू असलेली धावपळ म्हणजे बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादीची खरेदी. बाजारात पेरणीच्या या वस्तू खरेदी करत असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते.
तक्रार कुठे करावी ?
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात बियाणे, खते, कीटकनाशक इत्यादीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना तक्रार निवारण समिती, कृषी विभाग किंवा भरारी पथकाकडे तक्रार नोंदविता येणार आहे.
पुढील 10 ते 15 दिवसात खरीप हंगामाची खरी सुरुवात होईल. यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची कामे अर्ध्यावरच राहून गेली होती. चालू महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट थांबल्याने आता गेल्या काही दिवसापासून शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेले दिसून येत आहेत.
कोणत्या तक्रारी करता येतील ?
पेरणीसाठीचं खत, बियाणं, कीटकनाशक दर्जेदार नसतील, त्याचप्रमाणे विक्रेता शासकीय दरापेक्षा अधिक किंमत आकारत असेल आणि बियाणे खरेदी केल्यानंतर संपूर्ण शेतामध्ये बियाणं उगवलच नाही, तर अशा सर्व प्रकारच्या तक्रारी शेतकरी करू शकणार आहेत.
📢 हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी कर्ज देणारी योजना
तक्रारी सोबत बियाणं खत किंवा कीटकनाशक खरेदी केल्याबाबतचा पक्का बिल, तक्रारीचे स्वरूप इत्यादी माहिती तक्रार निवारण समिती, कृषी अधिकारी किंवा भरारी पथकाकडे द्यावी लागणार आहे.
तक्रार निवारण समितीची स्थापना
दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशक इत्यादीची खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते, ही बाब राज्य शासनाकडून लक्षात घेऊन कृषी निविष्ठा संदर्भातील तक्रारीच्या निराकरणासाठी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल निवारण समितीमार्फत घेण्यात येईल व संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.
सात भरारी पथकांचा समावेश
शेतकऱ्यांची होणारी गैरसोय, फसवणूक टाळण्यासाठी तालुकास्तरावर सहा व जिल्हास्तरावर एक अशा एकूण सात भरारी पथकांची नजर कृषी सेवा केंद्रावर असणार आहे. कृषी विभागातील तक्रार निवारण समितीसह सात भरारी पथकांचा समावेश देखील यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे.
तक्रारीसोबत काय द्यावे लागेल ?
शेतकऱ्यांकडून फसवणुकीची तक्रार झाल्यानंतर बियाणे, खते किंवा कीटकनाशकांच्या पक्या बिलाची पावती, तक्रारीचे स्वरूप इत्यादी माहिती तक्रार निवारण समितीकडे किंवा कृषी अधिकारी, भरारी पथकाकडे द्यावी लागणार आहे.
🌾 शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
🔔 सरकारी योजना | येथे क्लिक करा |
🔰 शासन निर्णय | येथे क्लिक करा |
⚖️ रेशन न्यूज | येथे क्लिक करा |