शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये त्याचप्रमाणे अनुदान व अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये दिवसेंदिवस बदल मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (aadhar pramanikaran) करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला असेल अशा सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असेल.
अतिवृष्टी अनुदान व नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य
ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान यादीत किंवा नुकसान भरपाई अनुदान यादीत नाव आला असेल अशा शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल, त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात येईल.
तुमचा आधार प्रमाणीकरण (Aadhar e-kyc) सहज सोप्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे घेऊन, आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- मोबाईल क्रमांक
- यादीतील विशिष्ट क्रमांक
- बँक पासबुक झेरॉक्स
Aadhar Pramanikaran महत्त्वाच्या बाबी
- शेतकऱ्यांनी यादीमधील आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक लिहून घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जावे.
- शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक माहीत नसेल, तर अधिक माहितीसाठी संबंधित तलाठी कार्यालयात संपर्क साधावा.
- विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाता क्रमांक किंवा अनुदान, नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये काही विसंगती असल्यास पोर्टलवरील असहमतीचे बटन दाबून शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी.
- शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण Otp Based व Biometric Based या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे, त्यासाठी केंद्रचालक तुम्हाला सहकार्य करतील.
- आधार प्रमाणीकरण करण्याची सेवा शेतकऱ्यांसाठी निःशुल्क असेल.
- आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणीकरण (e-kyc) झाल्याबाबतची पावती देण्यात येईल.
- यादीतील विशिष्ट क्रमांक वाचनासाठी व आधार प्रमाणिकरण करण्यासाठी तुमच्या गावातील संबंधित तलाठी किंवा ग्रामसेवक मार्गदर्शन करतील.
- एखाद्या गावातील शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई किंवा अतिवृष्टीसाठी पंचनामा झालेला असेल आणि शेतकऱ्यांचे नाव किंवा विशेष क्रमांक यादीमध्ये दिसत नसतील, तर अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांचे पुर्ननिरीक्षण संबंधित तहसीलदार यांच्याकडे सुरू असेल असे समजण्यात यावे.

आधार प्रमाणीकरणाचे अधिकृत पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आधार प्रमाणीकरण कोणत्या शेतकऱ्यांना करावं लागेल ?
ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी व नुकसान भरपाईसाठी नुकसान झाल असेल व अशा शेतकऱ्यांच यादीमध्ये नावाला असेल, त्यांना आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण कुठे करता येईल ?
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्र लागतील ?
आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक व यादीतील विशिष्ट क्रमांक लागेल.
Yadi kute bhetel
यादी संबंधित तलाठ्यांकडे भेटेल.. मागील नुकसान भरपाई किंवा अनुदान वाटप जुन्या यादीनुसार झाल्यास आवश्यकता नाही पुढील यादीसाठी ही प्रक्रिया लागू असेल.
epartment Of Revenue and Forest
Disaster Management, Relief and Rehabilitation
🙏
माझे नातेवाईक सध्या गुजरात मध्ये राहतात त्यांनी आधार प्रमाणीकरण कसे करावे
त्यांच्या मोबाईल वर otp सेंड होत नाही आहे
होईल सर परत परत प्रयत्न करा, मोबाईल क्रमांक तोच लिंक आहे का ? चेक करा त्याचप्रमाणे आधार लिंक मोबाईल क्रमांक रिचार्ज केला आहे का ? ते पण चेक करा कारण आधार क्रमांकाला योग्य नंबर लिंक असेल तर त्या नंबर वरती 100% ओटीपी येते