Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी असलेल्या कर्जमाफी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. ती बातमी म्हणजे 50 हजार कर्जमाफीची 4थी यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
50 हजार कर्जमाफी चौथी यादी : 50 hajar karjmafi 4th list
यापूर्वी शासनाकडून 50,000 रु. प्रोत्साहनपर कर्जमाफीच्या काही जिल्ह्यात 2 याद्या तर काही जिल्ह्यात 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मागील प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावं कर्ज माफीसाठी आलेली नव्हती. यादीत नाव न आलेले सर्व शेतकरी पुढील यादीची आतुरतेने वाट पाहत होते.
वाट पाहत असलेल्या अशा सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लघोलघ 2-3 दिवशीत कर्जमाफीची चौथी यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
यादीत नाव कुठे पाहावं ?
तुम्ही जर 50,000 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असाल व शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या चौथ्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल, तर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील सीएससी केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. याव्यतिरिक्त कर्जमाफीच्या याद्या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पाहता येणार नाही.
कदाचित तुमच्या गावाच्या तलाठ्यांमार्फत कर्जमाफीची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावण्यात येईल. त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का ? पाहू शकता !
आधार प्रमाणीकरण आवश्यक
कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. बायोमेट्रिक मशीनवर अंगुठा ठेवून आधार प्रमाणीकरण केल्यानंतर पुढील 8-15 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येईल.
कागदपत्र कोणती लागतील ?
फक्त आधार प्रमाणीकरण व बँक खाता क्रमांक पडताळून पाहण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता भासेल.
- लाभार्थी शेतकऱ्यांचा आधारकार्ड
- कर्ज खाता पासबुक
- बचत खाता पासबुक
- मोबाईल क्रमांक
♦️ हे पण वाचा : 50 हजार अनुदानाचा GR आला ! लवकरच रक्कम जमा होणार
♦️ हे पण वाचा : आता शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रु. मिळणार